शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

खोटी आश्वासने देऊन सर्वांनाच फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 00:54 IST

डिजिटल आणि कॅशलेसच्या माध्यमातून लोकांना लुटण्याचा प्रयत्न होतोय परंतु ग्रामीण भागात ही बाब लक्षात येत नाहीय. मात्र सरकारचे हे फसवे धोरण हळूहळू लक्षात येऊ लागले आहे. जीएसटी, नोटाबंदी याचा फायदा कुणालाच नाही हेच उत्तर आहे. तरु णांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जात आहे. याकडे लक्ष द्यायला वेळ सरकारला नाही, अशी टीका अजित पवार यांनी पाटोदा आणि बीड येथील जाहीर सभेत केली.

ठळक मुद्देराष्ट्रवादीची हल्लाबोल यात्रा : केंद्र आणि राज्य शासनाच्या कारभारावर अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची टीका

लोकमत न्यूज नेटवर्कबीड/पाटोदा : डिजिटल आणि कॅशलेसच्या माध्यमातून लोकांना लुटण्याचा प्रयत्न होतोय परंतु ग्रामीण भागात ही बाब लक्षात येत नाहीय. मात्र सरकारचे हे फसवे धोरण हळूहळू लक्षात येऊ लागले आहे. जीएसटी, नोटाबंदी याचा फायदा कुणालाच नाही हेच उत्तर आहे. तरु णांच्या रोजगाराचा प्रश्न दिवसेंदिवस वाढतच जात आहे. याकडे लक्ष द्यायला वेळ सरकारला नाही, अशी टीका अजित पवार यांनी पाटोदा आणि बीड येथील जाहीर सभेत केली.

बुधवारी बीड जिल्हयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची हल्लाबोल यात्रा दाखल झाली. पहिली सभा दुपारी पाटोदा येथे तर रात्री आठ वाजता बीड झाली. राष्ट्रवादीच्या हल्लाबोल यात्रेस बीड जिल्ह्यात भव्य आगमन झाल्यानंतर सभेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. या जाहीर सभेला विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी मंत्री राजेश टोपे, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आ. विक्र म काळे, आ.जयदेव गायकवाड, आ. सतिष चव्हाण, आ. रामराव वडकुते, आ.विद्या चव्हाण, आ. रामराव वडकुते, युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोतेपाटील, विदयार्थी संघटनेचे अध्यक्ष अजिंक्यराणा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवक जिल्हाध्यक्ष जयसिंह सोळंके, बाळासाहेब आजबे, रेखा फड, सोनाली देशमुख, महेंद्र गर्जे, मेहबुब शेख, डॉ,नरेंद्र काळे, पाटोदा तालुकाध्यक्ष विश्वभूषण नागरगोजे, रामकृष्ण बांगर, सभापती अमर नाईकवाडे आदींसह असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

या सरकारने राज्याला कंगाल केले आहे. शेतकºयांना कर्जमाफी नाही मात्र उदयोगपतींना कर्जमाफी दिली आहे. अडल्या-नडल्या शेतक-यांना सरकार का मदत करत नाही असा सवाल अजित पवार यांनी केला. साडेतीन वर्षात मोदींनी एकही पत्रकार परिषद घेतली नाही. निव्वळ हुकुमशाही, हिटलरशाही सुरु आहे. परंतु ही हुकुमशाही फार काळ टिकत नाही. संघर्ष केल्याशिवाय, बोट वाकडं केल्याशिवाय लोणी मिळत नाही. त्यामुळे मंत्र्यांना फिरणंही कठिण झालं पाहिजे, असे काम हल्लाबोलच्या माध्यमातून उभं राहिले पाहिजे असेही अजित पवार म्हणाले.

जनतेच्या पैशाच्या जीवावर सरकार जाहिरातीवर करोडो रु पये खर्च करत आहे. जनतेचा पैसा त्यांच्या कल्याणासाठी, त्यांच्या विकासासाठी खर्च केला पाहिजे परंतु या सरकारने अक्षरश: कंगाल करण्याचे धोरण सुरु ठेवले आहे, महाराष्टÑाला कर्जबाजारी केले, असा आरोप अजित पवार यांनी केला.

सरकारला खाली खेचा : मलिकया सभेमध्ये पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी देशात परिवर्तनाची लाट आली आहे. खोटी आश्वासने दिलेल्या सरकारला खाली खेचण्यासाठी जनता तयारीला लागली आहे हे गुजरातच्या निवडणूकीमधून समोर आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हल्लाबोल आंदोलन सुरु केले असून आंदोलनाची ठिणगी आता पडली आहे. त्याचा ज्वालामुखी कसा होईल असा प्रयत्न होऊ द्या, असे आवाहन नवाब मलिक यांनी यावेळी केले. राष्ट्रवादीमधून निलंबित माजी मंत्री सुरेश धस यांचे नाव न घेता शेलक्या शब्दात बोचरी टीका करत जित्राब अशी संबोधना अजित पवार यांनी पाटोद्याच्या सभेत केली. ज्यांची कसलीच पत नाही त्यांचे नाव तरी कशाला घेऊ, असा टोला नाव न घेता सुरेश धस यांना आ. मुंडे यांनी लगावला.

आज गेवराई, माजलगाव, अंबाजोगाईला सभादरम्यान, उद्या गुरु वार दि १८ रोजी सकाळी ११ वाजता गेवराई, दुपारी ३ वाजता माजलगाव तर सायंकाळी ७ वाजता अंबाजोगाई येथे हल्लाबोल यात्रेची सभा होणार आहे.स्व. मुंडे यांचा भाजपाने अवमान केला - धनंजय मुंडेऊसतोड कामगारांना भाजपाने वा-यावर सोडले, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाचा मतासाठी उपयोग केला. मात्र त्यांच्या नावे साधे महामंडळ काढले नाही. आता त्या ऊसतोड कामगारांसाठी मी काम करून दाखवेन, अशी ग्वाही विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी दिली. तर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये पाटोदा तालुक्यातील शेतकरी ऊसतोडणीसाठी बाहेर जातो. त्या ऊस कामगारांच्या कल्याणासाठी महामडंळ काढण्यात आले परंतु साडेतीन वर्षात या कामगारांच्या कल्याणासाठी एक रु पयाही आला नाही. आणि या महामंडळाचे परळी येथे कार्यालय असून ते आहे की नाही याचा शोध मी घेतोय परंतु ते मला अद्यााप सापडले नाही असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला. ऊसतोड कामगारांच्या प्रश्नासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काम करत असून तुमच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरलेल्या राकाँच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन धनंजय मुंडे यांनी केले.

दादा, आशीर्वाद द्या, लढण्यास तयार आहे - संदीप क्षीरसागरबीड येथील हल्लाबोल यात्रेच्या सभेचे नियोजन युवा नेते संदीप क्षीरसागर यांच्यावर सोपविले होते. अपेक्षेपेक्षाही जास्त गर्दी जमवून त्यांनी ही जबाबदारी पार पाडली.ही सभा यशस्वी होण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून संदीप क्षीरसागर, न.प. सभापती अमर नाईकवाडे, उपनगराध्यक्ष हेमंत क्षीरसागर, फारुक पटेल आदी मंडळी अहोरात्र परिश्रम घेत होती.या सभेत संदीप क्षीरसागर काय बोलणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. संदीप क्षीरसागर जेंव्हा भाषणास उभे राहिले तेंव्हा उपस्थितांनी टाळ्या वाजवून घोषणाबाजी करुन त्यांचा उत्साह वाढविला. अजित पवार, सुनील तटकरे, धनंजय मुंडे यांच्यासह व्यासपीठावरील सर्व नेते मंडळीही कौतुकाने याकडे बघत होती.दादा, तुम्ही आशीर्वाद द्या, कोणतीही निवडणूक असो, संघर्ष करण्यासाठी, लढण्यासाठी मी तयार आहे, असे सांगताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला आणि भैय्या, तुम आगे बढो, अशा घोषणा दिल्या.यावेळी बोलताना संदीप म्हणाले, मी जेव्हा मैदानात उतरलो तेंव्हा आमची स्थिती लगान चित्रपटातील संघासारखी होती. आमच्यासारखे दर्जेदार साहित्य नव्हते. परंतु अजितदादा, प्रकाशदादा सोळंके, अमरसिंह पंडित, धनंजय मुंडे आणि जिल्ह्यातील नेतेमंडळींनी दर्जेदार साहित्य (पाठिंबा) देऊन माझी ताकद वाढविली, आता माझा संघ परिपूर्ण असून, कोणाशीही लढण्यासाठी नव्हे तर जिंकण्यासाठी तयार आहे, असे त्यांनी सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला.