शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

टेंबे गणपतीचे दरवर्षी भाद्रपद एकादशीला होते आगमन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 23:56 IST

साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणेश.

ठळक मुद्देमाजलगावात सोमवारी होणार टेंबे गणपतीची स्थापना

पुरुषोत्तम करवा ।लोकमत न्यूज नेटवर्कमाजलगाव : साधारणत: गणेश चतुर्थीच्या दिवशीच श्री गणरायाचे आगमन होते. काही ठिकाणी दीड दिवसातच गणेश विसर्जन करण्यात येते. परंतु सामान्यपणे १० दिवसांच्या मुक्कामानंतरच गणपती आपल्या गावी जातात. मात्र माजलगाव येथे एका अनोख्या गणपतीची स्थापना होते तो म्हणजे टेंबे गणेश. या गणेशाचे वैशिष्ट्ये म्हणजे हा स्थापनाही उशिराने होते आणि अवघ्या पाच दिवसानंतर तो विसर्जित केला जातो. पण या दरम्यानच्या काळात कुठेही गणेश विसर्जन राहिलेले नसते. त्यामुळे या गणपतीला विशेष महत्व आहे. तसेच ब्रह्मवृंदांच्या हातानेच या गणपतीची मूर्ती साध्या मातीपासूनच अगदी परंपरेने ११८ वर्षांपासून बनवली जात असल्याने त्या मूर्तीला अनन्यसाधारण महत्व प्राप्त होते.भट गल्लीमध्ये स्थापन होणाऱ्या व नवसाला पावणारा गणपती म्हणून राज्यभर ओळख असलेल्या या टेंबे गणपतीची स्थापना यावर्षी सोमवारी होणार आहे. मंडळाने यासाठी जय्यत तयारी केली आहे. राज्यामध्ये आगळीवेगळी ओळख असलेल्या टेंबे गणपतीची स्थापना १९०१ साली निजाम राजवटीमध्ये झाली होती. निजामकाळापासून भाद्रपद एकादशीला टेंबे गणेशाचे आगमण होते आणि पाच दिवसांनी म्हणजे भाद्रपद पोर्णिमेला विसर्जन होते. या पाठीमागे देखील एक प्रसंग असून स्वातंत्र्यपूर्व काळात १९०१ साली निजाम राजवटीत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी रझाकारांची परवानगी लागत असे. गणेश चतुर्थीला टेंबे गणपतीच्या स्थापनेसाठी मंडळाच्या सदस्यांनी रझाकारांची परवानगी न घेता मिरवणूक काढली होती. गणपती बाप्पाच्या स्थापनेचा परवाना निझाम सरकारकडून मागितला गेला. त्यामुळे मंडळाचे तत्कालिन सदस्य कोंडोपंत जोशी, गणतप जोशी, मल्हार जोशी, राजाराम जोशी, राम जोशी, काशिनाथजोशी यांनी परवाना आणण्यासाठी वाहनांची सोय नसल्यामुळे घोड्यावरून भाग्यनगर म्हणजेच हैद्राबाद येथे गेले व तिथून ताम्रपटावर गणपती स्थापनेची परवानगी आणली.या दरम्यान गेलेल्या कालावधीमुळे या गणपतीची स्थापना उशिराने होते आणि विसर्जन देखील उशिराने होते. या पाच दिवसीय गणेशोत्सवात रक्तदान शिबीर, वृक्षारोपण, वह्या पुस्तके वाटप, गणवेश वाटप, दुष्काळग्रस्तांना मदत, सामूहिक विवाह सोहळा, गोरगरिबांना मदत आदी विविध सामाजिक उपक्र म दरवर्षी राबविण्यात येतात. यंदा वाजतगाजत सोमवारी भाद्रपद एकादशीला टेंबे गणपतीची स्थापन होणार आहे.

टॅग्स :BeedबीडGanpati Festivalगणेशोत्सवReligious programmeधार्मिक कार्यक्रम