शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

तासाभरासाठी २५ हजाराचे बिल घेऊनही गंभीर रुग्णास सोडेनात; लोटस हॉस्पिटलविरोधात तक्रार

By सोमनाथ खताळ | Updated: August 25, 2022 18:58 IST

बिल भरल्यानंतरही तासभर रेफर करणे थांबविले

बीड : शहरातील लोटस हॉस्पिटल पुन्हा एकदा वादात सापडले आहे. अपघातातील जखमीला प्रथमोपचारासाठी दाखल केले. परंतू प्रतिसाद मिळत नसल्याने आणि शस्त्रक्रियाचा खर्च जास्त सांगितल्याने या रूग्णाला औरंगाबादला रेफर करा, असे म्हणताच येथील डॉक्टर, कर्मचाऱ्यांनी रूग्णाच्या नातेवाईकांना अरेरावी करत उद्धव वागणूक दिली. तसेच बील भरल्यानंतरही एक तास रेफर केले नाही. जास्त बिल घेतले असा आरोप करत नातेवाईकांनी लोटसविरोधात जिल्हा शल्य चिकित्सकांकडे बुधवारी लेखी तक्रार केली आहे.

कारागृह निरीक्षक संजय कांबळे यांच्या मृत्यूनंतर हे लोटस हॉस्पिटल वादात सापडले होते. याची चौकशीही झाली होती. परंतू जिल्हाशल्य चिकित्सक बदलले आणि हे प्रकरणही मागे पडले. परंतू बुधवारी सकाळी शेख शरफोद्दीन (वय ५० रा.तेलगाव नाका, बीड) हे दुचाकीवरून बीडमधून घाटसावळीकडे जात होते. परंतू घोडका राजुरीजवळ त्यांचा अपघात झाला. लोकांनी उचलून त्यांना तात्काळ लोटस हॉस्पिटलमध्ये ठेवले. डाेक्याला गंभीर इजा असल्याने आणि शस्त्रक्रियाचा खर्च झेपत नसल्याने नातेवाईकांनी रूग्णाला औरंगाबादला रेफर करा, अशी विनंती केली. परंतू या हॉस्पिटलने उपचाराकडे तर दुर्लक्ष केलेच, परंतू अवघ्या तासाभरात २५ हजार रूपयांपेक्षा जास्त बील आकारले. तसेच बील भरल्यानंतरही तासभर रेफर केले नाही. तोपर्यंत रूग्ण जास्तच गंभीर झाला होता.

याबाबत विचारणा करण्यास गेल्यावर नातेवाईकांना अरेरावी करण्यासह उद्धट वागणूक दिली. हा सर्व प्रकार असह्य झाल्याने नातेवाईकांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुरेश साबळे यांच्याकडे धाव घेत लेखी तक्रार केली. आता यावर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. की मागच्यावेळी प्रमाणेच हे प्रकरण देखील मागे पडणार? असाही प्रश्न आहे. लोटस हॉस्पिटलचे डॉ.आशिष गर्जे यांना दोन वेळा संपर्क केला, परंतू त्यांनी फोन घेतला नाही.

तासाभरासाठी केले २५ हजारांचे बिलशेख शरफोद्दीन हे माझे मामा होते. डोक्याला मार होता. शस्त्रक्रियेसह इतर उपचारासाठी ६ दिवसांत ३ लाख रूपये लागतील, असे सांगितल्याने आम्हाला रेफर करा, अशी विनंती केली. परंतू डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांनी अरेरावी केली. तसेच अवघ्या तासाभरात २५ हजार रूपयांपेक्षा जास्त बिल घेतले. बील भरल्यानंतरही तासभर रेफर केले नाही. त्यामुळे आम्ही सीएसकडे लेखी तक्रार केली.- शेख सादेक पापामिया

समज दिली जाईल लोटस हॉस्पिटलमधील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी अरेरावी करण्यासह उद्धट वागणूक देऊन जास्तीचे बिल घेतल्याची तक्रार आली आहे. परंतू हे हॉस्पिटल महात्मा फुले योजनेत येत नाही. त्यामुळे त्यांनी किती बील घ्यावे, याला आपले नियंत्रण नाही. ते कोरोनाचे पेशंट असते तर चौकशी करता आली असते. परंतू उद्धट वागणूकीबद्दल समज दिली जाईल.- डॉ.सुरेश साबळे, जिल्हा शल्य चिकित्सक बीड

टॅग्स :doctorडॉक्टरBeedबीड