शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये वातावरण बदलामुळे ‘व्हायरल’ची साथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 00:57 IST

डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : डिसेंबरनंतर ओसरलेल्या थंडीमुळे वातावरण बदल होत असतानाच पुन्हा थंडीचा कडाका वाढल्याने विषाणूजन्य आजारांचा फैलाव मोठ्या प्रमाणावर वाढला. महिनाभरापासून अशा आजारांचे रुग्ण उपचार घेत असतानाच फेब्रुवारी उजाडल्यापासून पुन्हा वातावरणातील बदलामुळे अशा रुग्णांमध्ये भर पडत आहे. मागील काही दिवसांपासून बाल रुग्णालयांमध्ये सर्दी, खोकला, न्युमोनिया, अतिसार, ब्रॉन्क्युलायटिसचे आजार असलेले रुग्णांची गर्दी झाली आहे.काही बालकांमध्ये सर्दी, खोकला आढळून आला असून, असे आजार आपोआप मुदतपूर्ण करताच बरे होतात. मात्र, प्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे आजारी व्यक्तींशी संपर्क टाळावा. आजारी व्यक्तीने थुंकू नये, बालकांना गर्दीच्या ठिकाणांपासून टाळले पाहिजे तरच हा आजार नियंत्रणात राहून गुंतागुंतीचा होणार नाही, असे सांगण्यात आले. तीव्र श्वसनदाह असलेल्या बालकांचाही मोठ्या प्रमाणावर समावेश असून, श्वासाची गती वाढते, ताप येतो, चिडचिडेपणा अशी लक्षणे आढळून येतात. या आजारावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार करणे महत्त्वाचे ठरते.न्युमोनियाचेही काही रुग्ण आढळले असून, फुफ्फुसावर परिणाम करणारा गंभीर आणि गुंतागुंतीचा आजार आहे. मात्र, अशा वेळी रुग्णाला आत्मविश्वासाने हाताळले तर हा आजार नियंत्रणात येऊ शकतो. ताप आला तर घाबरायचे नाही. ओल्या कपड्याने पुसणे, तापेचे औषध देणे, वरण-भात, मूगदाळ खिचडीच्या माध्यमातून पोषण करणे, बाळाचे स्तनपान सुरु ठेवणे, स्वच्छ, शुध्द पाणी पिण्यास वापरणे महत्त्वाचे ठरते, जुलाब असणाºया रुग्णांसाठी स्वच्छ पाणी गाळलेले असावे. ओआरएसचा वापर करावा. ज्यामुळे रुग्णांना आधार होईल, असेही वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.महिनाभरापासून व्हायरल इन्फेक्शनच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झालेली आहे. पालकांनी न घाबरता वैद्यकीय सल्ल्यानुसार उपचार करुन घ्यावा. अँटीबायोटिकचा आग्रह न करता तापेसारखे आजार पाच दिवस गृहीत धरले पाहिजेत. उन्हाळ्याच्या सुरुवातीला कांजण्या, गोवर, गालफुगीच्या रुग्णांची वाढ होत आहे.- डॉ. संजय जानवळेबालरोगतज्ज्ञ