शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

अंबाजोगाईत चाळीस वर्षांपासूनच्या वस्तीवर अखेर महामार्गाचा ‘बुलडोझर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2018 01:20 IST

शेतात काम करूनही भागेना,म्हणुन गांव सोडुन कारखान्याच्या परिसरात वास्तव्य केलं. उपजीविका भागविण्यासाठी कोणी या रस्त्यावर हॉटेल टाकली, कोणी गाड्यांचे पंक्चर काढु लागले. कोणी टपऱ्या, कोणी दुकाने थाटली. चाळीस वर्षे या जागेत काढली. मात्र महामार्गाच्या कामात अडसर ठरणाºया या वस्तीवर अखेर मंगळवारी सकाळी बुलडोजर फिरले.अन् सगळं कसं होत्याचं नव्हतं झालं

अविनाश मुडेगावकर।लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : शेतात काम करूनही भागेना,म्हणुन गांव सोडुन कारखान्याच्या परिसरात वास्तव्य केलं. उपजीविका भागविण्यासाठी कोणी या रस्त्यावर हॉटेल टाकली, कोणी गाड्यांचे पंक्चर काढु लागले. कोणी टपऱ्या, कोणी दुकाने थाटली. चाळीस वर्षे या जागेत काढली. मात्र महामार्गाच्या कामात अडसर ठरणाºया या वस्तीवर अखेर मंगळवारी सकाळी बुलडोजर फिरले.अन् सगळं कसं होत्याचं नव्हतं झालं

अंबाजोगाईपासून सहा कि.मी.अंतरावर चाळीस वर्षापुर्वी अंबाजोगाई सहकारी साखर कारखान्याची उभारणी झाली. रोजगार निर्मिती करणार हा प्रकल्प ठरला. अनेकांना कारखान्यात काम मिळाले. ज्यांना शेती नाही, गावात मजुरी नाही अशा अनेक कुटुंबियानी कारखान्याच्या मोकळया परिसरात वास्तव्य केले. उदरनिर्वाहासाठी स्थलांतरित झालेल्या कुटुंबियांनी विविध छोटे छोटे व्यवसाय सुरु केले. या माध्यमातून जवळपास १५० कुटुंबियांना व्यवसाय मिळाला. त्यांची रोजीरोटी व्यविस्थत सुरु झाली. दूसरी पिढीदेखील हाच व्यवसाय जोपासू लागली. व्यवसायात प्रगती होत गेल्याने शेडची जागा पक्या घरांनी घेतली. नंतर इथे मोठी वस्तीच निर्माण झाली. साखर कारखाना सुरु झाला तेव्हा ही वस्ती मुख्य रस्त्यापासून दूर होती.कालांतराने रस्ते रुंद झाले. तसतशी वस्ती रस्त्यालगत आली. दरम्यान याच परिसरात महामार्गाच्या कामाला सुरु वात झाली. संपूर्ण वस्तीच अतिक्रमणात आली होती. मंगळवारी मात्र अतिक्रमण हटाव मोहिमेत सारं उजाड झालं.सार्वजनिक बांधकाम, महसूल विभागाची कारवाईसार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल विभागाचे दोन पथक आणि पोलिसांची एक तुकडी यांनी सकाळी आठ वाजेपासून सायंकाळपर्यंत संयुक्तपणे ही मोहीम राबविली. चाळीस वर्षाचे वास्तव्य असलेल्या या वस्तीवर मंगळवारी बुलडोझर फिरले, अन सगळं भुईसपाट झालं. अनेकांचे व्यवसाय थांबले. अनेकजण बेघर झाले. आता जायचे कुठे अन् करायचे काय? हा प्रश्न मात्र अनेकांच्या व्यथा निर्माण करणारा ठरला आहे.

टॅग्स :BeedबीडAmbajogaiअंबाजोगाईMarathwadaमराठवाडा