शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये कर्मचाऱ्यांचा संप; जनतेची कामे खोळंबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 23:57 IST

बीड : सातवा वेतन आयोग लागू त्वरित लागू करावा तसेच केंद्र शासनाप्रमाणे राज्य कर्मचाºयांना विविध लाभ देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय कर्मचाºयांनी मंगळवारपासून तीन दिवसांचे काम बंद आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलनकर्त्या शासकीय कर्मचाºयांनी, संपात सहभागी न झालेले व कामावर रुजू असणाºया कर्मचाºयांना बांगड्या भरल्याचा प्रकार ...

बीड : सातवा वेतन आयोग लागू त्वरित लागू करावा तसेच केंद्र शासनाप्रमाणे राज्य कर्मचाºयांना विविध लाभ देण्यात यावेत या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातील शासकीय कर्मचाºयांनी मंगळवारपासून तीन दिवसांचे काम बंद आंदोलन सुरु केले. यावेळी आंदोलनकर्त्या शासकीय कर्मचाºयांनी, संपात सहभागी न झालेले व कामावर रुजू असणाºया कर्मचाºयांना बांगड्या भरल्याचा प्रकार बीडमध्ये घडला.

जिल्हाधिकारी कार्यालयापुढे राज्य सरकारी, निमसरकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल, जिल्हा रुग्णालय, जलसंपदा, कोषागार यासह इतर शासकीय कार्यालयातील कर्मचारी शेकडोच्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते. आंदोलनादरम्यान सरकारविरोधी घोषणा देण्यात आल्या. यावेळी संघटनेच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या मागण्या कर्मचाºयांपुढे व्यक्त केल्या, या संपामध्ये सर्व संघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने केले होते.

या संपात ३६ शासकीय कर्मचाºयांच्या संघटना सहभागी झाल्या होत्या. तर काही संघटनांनी संपात सहभागी न होता पाठिंबा दिला होता. कर्मचा-यांच्या संपामुळे सर्व शासकीय कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता. यावेळी आरोग्य विभागातील परिचारिका व इतर कर्मचारी देखील या संपात सहभागी झाले होते. मात्र ही अत्यावश्यक सेवा असल्यामुळे या संपात प्रमुख कर्मचारी सहभागी झाले होते. आरोग्य सेवा सुरळीत सुरु राहावी यासाठी सर्व आरोग्य कर्मचारी कामावर रुजू होते.

राज्य शासनाने मागण्या मान्य कराव्यात व प्रमुख मागण्यांचे लेखी आश्वासन द्यावे, अन्यथा पुढील काळात बेमुदत संप करण्याचा इशारा यावेळी संघटनांकडून देण्यात आला. यावेळी राज्य कर्मचारी संघटनेचे नवनाथ नागरगोजे, ए.बी राऊत, चंद्रकांत जोगदंड, महादेव चौरे, परमेश्वर राख, इंद्रजित शेंदूरकर, अरविंद राऊत, नसीर पठाण, अनिल सूत्रे, सुहास हजारे, शंकर बुराडे, अनिल तांदळे, श्रीनिवास केकाण, बालाजी परदेशी, राहुल धोंगडे, राहुल शेकडे यांच्यासह मोठ्या संख्येने कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले होते.

टॅग्स :BeedबीडMarathwadaमराठवाडाGovernment Employees Strikeसरकारी कर्मचाऱ्यांचा संप