बँकेत शेतकऱ्यांची, बाहेर दुचाकींची गर्दी
शिरूर कासार : शहरातील मुख्य रस्त्यावर भारतीय स्टेट बँकेत सध्या पीक कर्जाचा भरणा व नवीन कर्ज घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी होत आहे. त्यामुळे बँकेबाहेर बाजार भरावा, त्याप्रमाणे ग्राहकांच्या दुचाकींची गर्दी होत असून रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे.
कोविड सेंटरकडे जाणारा रस्ता खड्ड्यांमुळे त्रासाचा
शिरूर कासार : शासकीय निवासी शाळेत शासकीय कोविड सेंटर चालू आहे. मात्र या रस्त्यावरील खड्डे त्रासदायक ठरत आहेत. हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्याची मागणी होत आहे.
पालखी प्रस्थानचे स्मरण म्हणून झाड लावा
शिरूर कासार : संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाले, तर शुक्रवारी माऊलींच्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान होत आहे. कोरोनामुळे निर्बंध लागल्याने जागेवरच पालखी सोहळ्याचे साक्षीदार व्हावे, तसेच प्रस्थानची आठवण म्हणून एक झाड लावण्याचे आवाहन स्वामी विवेकानंद शास्त्री यांनी केले आहे.
लग्नात वाजू लागले वाद्य
शिरूर कासार : कोरोनामुळे सर्वच कार्यक्रमांसह मंगल कार्यालयदेखील बंद होते. लग्न कुठे लागत होते, याचा थांगपत्ता लागत नव्हता. मात्र आता कोरोनाचा वेग मंदावला असल्याने मर्यादित उपस्थितीत लग्नसोहळे सुरू असून वाद्यांचा आवाज कानी पडत आहे.