दिंद्रुड : येथील प्राथमिक अरोग्य केंद्रात शनिवारी तब्बल १६२ ज्येष्ठांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली. आठवड्यातील बुधवार व शनिवारी या दोन दिवशी दिंद्रुड येथे लस देण्यात येणार असून, दिंद्रुड व परिसरातील जनतेने लस घेण्यासाठी पुढे येण्याचे अवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
दिंद्रुड येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात कोरोना विषाणू प्रतिबंधक लस देण्यास बुधवारपासून सुरुवात झाली. यावेळी पात्रुड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.याज्ञिक रणखांब यांनी दिंद्रुड ज्येष्ठ नागरिकांनी न घाबरता, कोरोना प्रतिबंधक लस घेण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत शनिवारी ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लसीकरण करून घेतले.
ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधक लसीबद्दल अनेक शंका-कुशंका असल्याने, नागरिक लस घेण्यासाठी पुढे येत नाहीत. ही लस अत्यंत सुरक्षित असून, कोरोना आजारापासून आपला बचाव करते, त्यामुळे कुठलीही शंका न बाळगता, सर्व ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन डाॅ.रणखांब यांनी केले.
येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात समुदाय आरोग्य अधिकारी डाॅ.स्वाती काशिद, मुख्य आरोग्यसेविका वर्षा पवार, आरोग्य सहायक बी.जे. ठोंबरे, आरोग्यसेविका कीर्ती सोळंके, आशा वर्कर मंदा कसबे देशमाने, शीतल सिरसे, सविता काटे, मनोरमा लाड यांनी ज्येष्ठ नागरिकांना लस देण्याची व्यवस्था केली आहे.
===Photopath===
030421\img_20210403_155926_14.jpg