शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

खोट्या तक्रारी करून बीड जिल्हा रुग्णालयात वरिष्ठांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2019 13:47 IST

जिल्हा रुग्णालयातील सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने काढले पत्रक

ठळक मुद्देबीड जिल्हा रुग्णालय मागील आठ दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे.वरिष्ठ विरूद्ध कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे.

बीड : जिल्हा रुग्णायलात ११ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वरिष्ठांविरुद्ध तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर यातील काही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माघार घेतल्याचेही समोर आले होते. आता यात परिचारीका संघटनेनेही उडी घेतली आहे. या वादामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत चालल्याचे सांगत त्यांनी वरिष्ठांविरोधात खोट्या तक्रारी करून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोकांकडून केला जात असल्याचे पत्रक सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने प्रसिद्धीसाठी काढले आहे. 

जिल्हा रुग्णालय मागील आठ दिवसांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. वरिष्ठ विरूद्ध कनिष्ठ असा वाद निर्माण झाला आहे. ड्यूटी व रजेच्या कारणांसह विविध आरोप करणारी तक्रार करणाऱ्यांपैकी जवळपास ८ ते ९ डॉक्टरांनी माघारही घेतल्याचे समजते आहे. तक्रारदार डॉक्टरांनी याबाबत दोन दिवसांपूर्वी आ.धनंजय मुंडे यांचीही भेट घेतली होती. या प्रकरणाची चर्चा सर्वत्र झाल्याचे सांगत सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारीका संघटनेने प्रसिद्धीसाठी पत्रक काढले आहे. 

या वादामुळे आरोग्य विभागाची प्रतिमा मलीन होत चालली आहे. नागरिकांचा आरोग्य विभागाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलत असून आरोग्ये सेवेवरही परिणाम होत आहे. ठराविक डॉक्टरांनी केलेली तक्रार करून वरिष्ठांवर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. तसेच कामात हलगर्जीपणा करण्यासाठी हा खेळ खेळला जात असल्याचे त्यांनी पत्रकात म्हटले आहे. तसेच परिचारीकांना वरिष्ठांनी वेळोवेळी सहकार्य केले असून आमची त्यांच्या विरोधात कसलीही तक्रार नसल्याचे सांगत वरिष्ठांना अप्रत्यक्ष पाठिंबा दिला आहे. या निवेदनावर अध्यक्ष संगिता दिंडकर, उपाध्यक्ष जयश्री उबाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. राज्याध्यक्ष सत्वशिला मुंडे, राजेंद्र औसरमल, सचिव मंदाकिनी खैरमोडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे लेटरहेडवर नावे आहेत. 

दबाव टाकल्याचा आरोप?११ पैकी ९ वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्याला तक्रारीची मुळ प्रत न दाखविता स्वाक्षऱ्या घेतल्याचे सांगत यातून माघार घेतल्याचे समजते. वास्तविक पाहता, वर्ग २ च्या पदावर असताना प्रत न वाचता स्वाक्षऱ्या करण्याचे कारण न पटणारे आहे. यात राहिलेल्या तीन डॉक्टरांनी तक्रारदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. यावर थेट प्रतिक्रिया देण्यास मात्र, त्यांनी नकार दिला.

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टरBeedबीड