शहरं
Join us  
Trending Stories
1
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
2
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
3
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
4
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
5
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?
6
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा
7
Tata च्या Harrier EV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; काही तासांत हजारो युनिट्सची विक्री...
8
"मी यूपीचा, पण महाराष्ट्रासाठी रक्त सांडलं, तेव्हा तुमचे...?"; भाषा वादावरून 26/11 च्या 'नायका'चा राज ठाकरेंना थेट सवाल
9
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
10
'ऑपरेशन सिंदूर'मुळे घाबरलेला पाकिस्तान आता चीनकडून घेणार 'केजे-५००'! कसं आहे 'हे' नवं विमान?
11
तेरा वर्षीय मुलाने तुळशीच्या पानावर साकारले विठ्ठल! पाहा माऊलीचं सुंदर रूप
12
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
13
"राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तो दिवस आठवला...", मराठी अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
14
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
15
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
16
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
17
"भाऊ एक झाले की शहराला बळ येतं...", प्रसिद्ध मराठी लेखकाची ठाकरे बंधूंसाठी पोस्ट
18
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
19
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
20
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया

खाद्यतेलाने महागाईत तेल ओतले, बिनभाजीची फोडणी कशी द्यायची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:34 IST

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे दहा ते पंधरा रूपयांनी उतरले. मात्र त्यानंतर तेलाचे भाव ...

मागील वर्षी २०२० मध्ये फेब्रुवारी महिन्यातील खाद्यतेलाचे दर मार्चमध्ये लिटरमागे दहा ते पंधरा रूपयांनी उतरले. मात्र त्यानंतर तेलाचे भाव कधी २ तर कधी ५ रूपये लिटरने टप्प्या टप्प्याने वाढत गेले. संथगतीने दरवाढ सुरूच होती. ऑक्टोबर- नोव्हेंबरदरम्यान लिटरमागे १० ते २५ रूपयांची वाढ झाली. दिवाळीनंतर खाद्यतेलाचे भाव उतरतील अशी व्यापारी व ग्राहकंची अपेक्षा फोल ठरली. अनपेक्षितपणे तेलदराचा भडका सुरू राहिला. खद्यतेलाच्या दरवाढीने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असून महिन्याच्या बजेटवर त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे.

खायला चुकणार नाही

खाद्यतेलाचे भाव वाढले असलेतरी खायला चुकणार कसे? दैनंदिन जीवनात तेल आवश्यक बनले आहे. महिन्याला खरेदीचे प्रमाण कमी केले तरी गरजेच्या वेळी वापरासाठी अतिरिक्त खरेदी करावीच लागते. बिनफोडणीची भाजी कोणती करावी? केली तर सर्वांना आवडेल असे नाही. -- कंचन खिंवसरा, बीड

--------

कितीही दरवाढ झाली तरी साखर, मीठ, तेल अत्यावश्यक आहे. पालेभाज्यांसाठी कमी प्रमाणात तेल वापरता येईल मात्र इतर भाज्यांना तेल थोडे जास्तच लागते. प्रती माणसी महिन्याला अर्धा किलो तेल आश्यक असलेतरी अगदी काटेकोर प्रमाण धरून संसार कसा चालेल? - अयोध्या पाटील, बीड.

------------

खाद्यतेलाचे भाव वाढल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले असलेतरी त्या सहनशील असतात. रोजच्या स्वयंपाकात तेल अत्यावश्यक आहेत. खरेदी करताना तेलाऐवजी इतर वस्तुंचे प्रमाण कमी करावे लागते. यातून आर्थिक ताळमेळ बसवण्याचा प्रयत्न करतो पण तेल खूपच महागले आहे. - जया खेडकर, बीड.

----------

खाद्यतेलाचे दर (प्रति लिटर) २०२०

पाम ८५, सोयाबीन ९०, सूर्यफूल ९५, सरकी ८८, शेंगदाणा १३०, करडी १४०

खाद्यतेलाचे दर (प्रति लिटर) २०२१

पाम १२५ , सोयाबीन १४०, सूर्यफूल १७०, सरकी १३८, शेंगदाणा १७५, करडी २००

----

सूर्यफूल तेजीत येताच सोया, पामतेल वधारल

ऑक्टोबरमध्ये सूर्यफूल तेलाचे भाव भडकताच सोयाबीन अणि पामतेलाचे दर तेजीत आले. गतवर्षीच्या तुलनेत सर्यफूल तेलात लिटरमागे ८५ रूपयांची वाढ झाली. तर करडीचे तेल ६० रूपयांनी वधारले.

------

सूर्यफूल तेल आयातीवर अवलंबून आहे. युक्रेन, रशियात उत्पादन ५० टक्क्यांपर्यंतच झाले आहे. तर भारतात आयात शुल्क वाढल्याने तेजी आली. परिणामी स्थानिक तेलही महाग झाले. तेलाचे भाव ४० ते ८० रूपयांपर्यंत वाढले असलेतरी विक्रीवर परिणाम झालेला नाही. भाव ऐकताच ग्राहक प्रथमदर्शनी घेत नाही, मात्र भावाबाबत खात्री पटल्यानंतर खरेदी करतो. - गंगाबिशन करवा, किराणा व्यापारी

--------