शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी विरोधी धोरणांमुळेच देशात आर्थिक मंदी : राजू शेट्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2019 17:28 IST

मंदी रोखण्यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवावे

ठळक मुद्देपरकीय चलन मोठ्या प्रमाणात  खर्च होत आहे.

अंबाजोगाई : शासनाकडून शेतकऱ्यांच्या विरोधी धोरण राबवीले जात असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. ती रोखण्यासाठी शेती मालाला योग्य भाव व शेतकर्‍यांच्या हिताचे धोरण राबवीणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन  स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा. राजू शेट्टी केले.

अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव येथे मंगळवारी  आयोजीत करण्यात आलेल्या दुष्काळ मुक्तीच्या महामेळाव्यात ते बोलत होते.  यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पाटोदा येथील सरपंच बाळासाहेब देशमुख होते.तर व्यासपीठावर  सत्तार शेख, जयजित शिंदे, अरूण कुलकर्णी, जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे, रसीका ढगे, प्रा. डॉ. प्रकाश पोकळे, अॅड. विजय जाधव, गणेश मांझे, रावसाहेब अंबानी, किशोर ढगे, किशन कदम, अनील पवार, योगेश शेळके, तालमणी उध्दवबापू आपेगावकर, अॅड. संतोष पवार होते. 

प्रास्ताविक करतांंना आपेगाव येथील शेतकरी जयजित शिंदे म्हणाले की,  आपेगाव येथील शेतकऱ्यांना पिकविमा मिळाला नाही म्हणून शासन- प्रशासनाने दखल घेतली नाही यामुळे  शेतकऱ्यांवर २५ किमी पायी चालण्याचा मोर्चा काढण्याची वेळ आली होती. या भागात गुरांच्या चाऱ्यांचा प्रश्न गंभीर असून गुरे जगवण्यासाठी चारा छावण्या सुरू कराव्यात. या कार्यक्रमास परिसरातील शेतकरी, महिला  मोठ्यासंख्येने उपस्थित होते 

रझाकार बरे म्हणण्याची वेळ पुढे बोलतांना राजू शेट्टी म्हणाले की, परदेशातून मोठ्या प्रमाणात जिवनावश्यक  वस्तू आयात  कराव्या लागत असल्याने  देशाचे परकीय चलन मोठ्या प्रमाणात  खर्च होत आहे. या कारणामुळे पैशाचे मुल्यांकन ढासळले असल्याने देशात आर्थिक मंदी आली आहे. विमा कंपन्याच्या माध्यमातून कंपन्याचे मालक जगवीण्याचे धोरण सरकार राबवत असल्याने त्यांच्यापेक्षा रझाकार बरे होते असे म्हणण्याचे वेळ आली असल्याची टिका शेट्टी यांनी केली. 

 

टॅग्स :Raju Shettyराजू शेट्टीBeedबीडSwabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटना