शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये घराणेशाही; पवार, क्षीरसागरांची तिसरी तर मुंडे, मुंदडा, सोळंके, पंडितांची दुसरी पिढी

By सोमनाथ खताळ | Updated: May 4, 2024 17:27 IST

या कुटुंबांनी आपलाच वारसदार राजकारणात पुढे आणल्याने काही ठिकाणी इतरांना संधीच मिळत नसल्याचे दिसत आहे.

बीड : आपलाच वारसदार आमदार, खासदार अन् मंत्री व्हावा, असा काहीसा अलिखित नियम झाला आहे. जिल्ह्यातही अशीच काहीसी परिस्थिती आहे. पवार, क्षीरसागरांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. यासोबतच मुंडे, मुंदडा, सोळंके आणि पंडितांची दुसरी पिढी आता राजकारणात यशस्वी होऊ पाहात आहे. लोक याला घराणेशाही म्हणत आहेत. या कुटुंबांनी आपलाच वारसदार राजकारणात पुढे आणल्याने काही ठिकाणी इतरांना संधीच मिळत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, काही मतदारसंघात मात्र लोक घराणेशाहीला विरोध करून नवीन चेहरा शोधत असल्याचे दिसत आहे. त्यांच्याविरोधातही नवे नेते, तरुण नेते पुढे येऊ पाहत आहेत.

केज - सासूनंतर सुनेने चालवला वारसादिवंगत विमल मुंदडा यांचा केज विधानसभा मतदारसंघात प्रभाव होता. त्यांच्या निधनानंतर सून नमिता मुंदडा समोर आल्या. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करत आमदारकीचा गुलाल उधळला. त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा हे मतदारसंघात सक्रिय असतात. त्यामुळे मुंदडा कुटुंबांचा संपर्क अधिक आहे.

माजलगाव-सोळंके पिता-पुत्र मंत्रीमाजलगावात सुंदरराव सोळंके हे उपमुख्यमंत्री होते. त्यांचा वारसा प्रकाश सोळंके यांनी चालवला. तेदेखील मंत्री झाले होते. आता याच कुटुंबातील जयसिंह सोळंके पुढे येत आहेत. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापतीही ते राहिले आहेत.

गेवराई-पवारांची तिसरी, पंडितांची दुसरी पिढीगेवराई मतदारसंघात सध्या भाजपचे ॲड. लक्ष्मण पवार हे विद्यमान आमदार आहेत. त्यांचे वडील माधवराव पवार आणि आजाेबा शाहूराव पवारही आमदार होते. आता आ. पवार यांचा पुतण्या शिवराज पवार सक्रिय होत आहेत. यासोबतच माजी मंत्री शिवाजीराव पंडित यांचीही दुसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे. अमरसिंह पंडित हेदेखील आमदार राहिले असून, त्यांचे बंधू विजयसिंह पंडित हे २०१९ ची विधानसभा निवडणूक अवघ्या काही मतांनी पराभूत झाले होते. विजयसिंह हे जिल्हा परिषदेचे अध्यक्षही राहिलेले आहेत. आता या कुटुंबातील रणवीर पंडित, पृथ्वीराज पंडित यांनी संपर्क वाढवला आहे. माजी मंत्री बदामराव पंडित यांचा मुलगा युद्धजित पंडितही सक्रिय आहेत; परंतु या दोन्ही पंडितांचा एकमेकांना राजकीय विरोध आहे.

बीड-क्षीरसागरांची तिसरी पिढीकेशरकाकू क्षीरसागर यांना पाचवेळा लोकसभा निवडणुकीत उमेदवारी मिळाली. यामध्ये त्यांनी तीनवेळा विजय मिळवला. त्यानंतर त्यांचा वारसा जयदत्त क्षीरसागर आणि डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांनी पुढे चालवला. याच कुटुंबातील तिसऱ्या पिढीतील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर हे सध्या बीडचे आमदार आहेत. तसेच डॉ. भारतभूषण यांचा मुलगा डॉ. योगेश आणि सून डॉ. सारिका क्षीरसागरही सक्रिय झाल्या आहेत.

परळी-मुंडे बहीण-भाऊ आता एकत्रगोपीनाथ मुंडे यांच्यामुळे बीडचे नाव देशात चमकले. त्यांची मोठी मुलगी पंकजा मुंडे या ग्रामविकासमंत्री राहिल्या असून, सध्या लोकसभेच्या उमेदवार आहेत. त्यासोबतच डॉ. प्रीतम मुंडे यादेखील सलग दोन वेळा खासदार राहिल्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे धनंजय मुंडे हेदेखील पालकमंत्री आहेत. या कुटुंबातील तिसरी पिढी आणखी सक्रिय नाही.

टॅग्स :beed-pcबीडlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४big Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४