शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे माजलगावात घाणीचे साम्राज्य, शहरात साथरोगांचे थैमान 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2017 18:46 IST

केवळ एकाच वर्षातील नगर पालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त  झाले आहेत. 

ठळक मुद्देशहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. केवळ नियोजना अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे. 

माजलगांव ( बीड ) : शहरात गल्ल्या बोळांमध्ये तसेच मुख्य रस्त्यांवरसुद्धा सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. जागोजागी साचलेल्या घाणीमुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. केवळ एकाच वर्षातील नगर पालिकेच्या  या ढिसाळ कारभारामुळे मात्र नागरिक चांगलेच त्रस्त  झाले आहेत. 

माजलगांव नगर पालिकेचा कारभार कोणत्याही पक्षाकडे असो शहराची स्थितीत मात्र काहीच बदल दिसत नाही. सहाल चाऊस हे अध्यक्षपदी निवडल्यानंतर कांहीतरी बदल होईल अशा अपेक्षेने माजलगांवकरांना होत्या. मात्र, चाऊस यांच्या सत्तेचे नव्याचे नऊ दिवस संपल्यानंतर शहराची परिस्थिती पहिल्या सारखीच बकाल झाली आहे. 

नगराध्यक्ष मुख्याधिकारी यांच्यात विसंवाद चाउस यानी अध्यक्षपदाचा पदभार घेतल्यानंतर त्यांचे आणि मुख्याधिकारी यांचे न पटल्याने शहराचा विकास खंडीत झाला. साध्या मुलभुत गरजा पुरविण्यात देखील पालिकेला अपयश आले. दोन महिन्यांपूर्वी मुख्याधिकारी बी.सी. गावित यांची बदली झाल्यानंतर वडवणी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याकडे येथील प्रभार आला आहे. मात्र, ते केवळ केवळ कार्यालयीन कामकाजावरच भर देत आहेत.

शहरभर घाणीचे साम्राज्य मुख्य रस्त्यासह गल्लीबोळांमध्ये जागोजागी कच-यांचे ढिगारे साचलेले आहेत. नाल्या तुंबलेल्या असुन घाण पाणी रस्त्यांवरुन वाहात आहे. साचलेले कच-याचे ढिगारे उचलणे, नाले सफाई व पाईपलाईन लिकेज काढण्यात नगर पालिका असमर्थ ठरत आहे. यामुळे डासांचा मोठया प्रमाणावर प्रादुर्भाव वाढला असून शहरात साथीचे रोग वाढले आहेत. याबाबत येथील मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड यांच्याशी सपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होवू शकला नाही. 

सफाई कर्मचा-यांवर होतो लाखोंचा खर्च नगर परिषदेची आर्थिक परिस्थिती डामाडौल असतांना कायम व रोजंदारी कर्मचा-यांवर नगर परिषद दर महिन्याला लाखोरुपयांचा खर्च करते. सध्या पालिकेत 65 कायमस्वरुपी व रांजंदारीवरील 35 असे कर्मचारी सफाई व स्वच्छतेसाठी कार्यरत आहेत. असे असतानाही केवळ प्रशासकीय नियोजना अभावी शहर दिवसेंदिवस बकाल होत आहे.