शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये आवक वाढल्याने भाज्या झाल्या मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 00:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : येथील बाजारात मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव अत्यंत कमी असल्याने ग्राहकांना अच्छे दिन आले ...

ठळक मुद्देपोषक वातावरणाचा परिणाम : मेथी, कोथिंबीर, शेपू, करडई जुडी रुपयाला एक, बटाटे १० रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : येथील बाजारात मागील काही दिवसांपासून भाज्यांचे भाव अत्यंत कमी असल्याने ग्राहकांना अच्छे दिन आले असलेतरी शेतक-यांचे मात्र कंबरडे मोडले आहे. पिकविलेल्या भाज्यांना भाव कमी असुनही ग्राहकी नसल्याने दररोज ५ ते ७ टन भाजी सडते आहे. त्यामुळे व्यापा-यांनाही नुकसानीचा फटका सहन करावा लागत आहे.

येथील भाज्यांच्या आडत आणि किरकोळ बाजारात फेरफटका मारल्यानंतर भाज्यांचे भाव गडगडलेले दिसून आले. ठोक बाजारात चांगल्या प्रतीचे टोमॅटो १५० ते २०० रुपये क्रेट, वांगे १५० ते २०० रुपये क्रेट, वाटाणे २५ ते ३० रुपये किलो, लसूण १८ ते ३० रुपये किलो, आले २० ते ३० रुपये किलो, फ्लॉवर १० ते १२ आणि पत्ता कोबी १० ते १५ रुपये किलो होते. तर शेवगा ५० ते ७०, गवारी ३० ते ३५ रुपये किलो, दोडके २० ते ३० रुपये किलोे भाव होते. तर हलक्या प्रतीच्या भाज्यांचे दर कमी होते.

किरकोळ बाजारात साधारण प्रतीच्या मालाचे अत्यंत कमी भाव दिसून आले. यात टोमॅटो १० ते २० रुपये किलो, वांगे १० रुपये किलो, मिरची १० ते २० रुपये काकडी ५ ते १० रुपये किलो दराने विकली. यामुळे शेतकºयांच्या पदरी घोर निराशाच आली. तर सकाळपासून दुपारपर्यंत भाजी विकून जाणा-या शेतक-यांना सायंकाळपर्यंत ग्राहकांची प्रतीक्षा करावी लागत आहे.

कोथिंबीर, मेथी, शेपू, पालक, करडईची जुडी एक रुपयांना एक प्रमाणे होती. पालेभाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक झाल्याने भाव घसरल्याचे किरकोळ विक्रेते रमजान बागवान यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.कांद्याचे भाव स्थिरबाजारात कांद्याचे भाव टिकून आहेत. २५ ते ३० रुपये किलो ठोक तर ४० रुपये किलो किरकोळ भाव आहेत. आग्रा येथील बटाट्याचे ठोक भाव ६०० ते ८०० रुपये क्विंटल तर किरकोळ भाव १० रुपये किलो प्रमाण होते.शेतकरी - विक्रेत्यांना फटकायेथील भाजी आडत बाजारात दररोज ३० ते ४० टन भाज्यांची आवक होत आहे. उठाव नसल्याने भाव मिळत नसल्याची परिस्थिती आहे. रोज जवळपास ५ ते ७ टन खराब झालेल्या भाज्या फेकून देण्याची वेळ येते. त्यामुळे शेतकरी आणि विक्रेत्यांनाही फटका बसत आहे.