शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पांढऱ्या सोन्याला यंदा दुष्काळाचा गंज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2018 00:22 IST

तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे.

ठळक मुद्देगेवराई तालुक्यातील परिस्थिती : २५ गावांत पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न; कापसाच्या उत्पादनात घट

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : तालुक्यात यावर्षी पावसाने हुलकावणी दिल्याने तालुक्यातील खरीपातील पिके धोक्यात आली आहेत. तालुक्यातील सर्व लघुप्रकल्प कोरडेठाक पडले असल्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. सध्याच्या परिस्थितीत तालुक्यातील २५ गावात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या चार वर्षानंतर अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेल्या अवस्थेत आहे.गेवराई तालुक्यात एकूण भौगोलिक क्षेत्र १ लाख ६ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यातील पेरणीलायक १ लाख ३४ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे. यावर्षी सुरुवातीला पावसाने काही प्रमाणात पावसाने हजेरी लावल्याने तालुक्यातील गेवराई, रेवकी, तलवाडा, जातेगाव, सिरसदेवी, पाचेगाव, मादळमोही, चकलांबा, उमापूर, धोंडराई या दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी कापूस ७४ हजार हेक्टर, बाजरी, तूर, सोयाबीन, मूग, भूईमूग, मका सह आदी खरीपातील पेरण्या जवळपास ९८ हजार हेक्टर क्षेत्रात करण्यात आल्या होत्या. सुरुवातीलाच पाऊस कमी प्रमाणात पडल्याने तालुक्यातील सर्व पिके ही सलाईनवर होती. कोणत्याही पिकाची वाढ झालेली नाही. त्यामुळे शेतकºयांची आर्थिक पिकेच वाया गेली असून, अत्यल्प प्रमाणात उत्पन्न मिळणार आहे. दरम्यान, शेतकºयांनी उधार उसनवारी करून केलेला खर्च निघणे सुद्धा कठीण झाले आहे.गेवराई तालुका कापसाच्या उत्पादनासाठी मराठवाड्यात एक क्रमांकाचा तालुका मानला जातो. तालुक्यातील विविध भागात जवळपास २५ जिनिंग उभ्या करण्यात आलेल्या आहेत. मात्र, मागील वर्षी कापसाच्या उत्पादनात ५० टक्के जवळपास घट झाली होती. यावेळी जवळपास ८० टक्के कापसाचे उत्पादन कमी होणार असल्याचे शेतकºयांनी सांगितले.गेवराई तालुक्यातील विविध भागात दमदार पाऊसच झाला नसल्यामुळे तालुक्यातील गोविंदवाडी, मादळमोही, जव्हारवाडी, शिंदेवाडी, खडकी, चकलांबा, बंगाली पिंपळा येथील लघुप्रकल्पातील पाणीसाठा शून्य झाला आहे. परतीच्या पावसाने जर मेहरबानी केली तर हे लघुप्रकल्प भरू शकतील.गेवराई तालुक्यातील दहा महसुली मंडळाच्या ठिकाणी अत्यल्प प्रमाणात पाऊस पडला असल्यामुळे तालुक्यात नदी, नाले, भरले नाहीत. त्यामुळे सध्या विहिरी आणि बोअरने तळ गाठला असल्याने तालुक्यातील जवळपास पंचवीसपेक्षा जास्त गावात पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पावसाळ्यातच उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाळ्यातच उन्हाळा : पिके करपू लागलीगेवराई तालुक्यातील हलक्या व भारी जमिनीतील कापसाच्या पिकानी माना टाकल्या असून पावसाची नितांत आवश्यकता आहे. गोदावरीच्या व उजव्या कालव्याच्या धोंडराई, तळणेवाडी, राक्षसभुवन, सुरळेगाव, सावळेश्वर, माळस पिंपळगाव, कोल्हेर, लुखामसला, भोजगाव व इतर ठिकाणी उसाचे जवळपास २० हजार हेक्टर क्षेत्र आहे. मात्र, अनेक दिवसांपासून पाउसच नसल्यामुळे ऊस करपायाला लागले आहेत.तालुक्यातील शेतकºयांनी परतीचा पाऊस पडल्यावर ज्वारीचे पिके घ्यावीत. कारण यामुळे ज्वारी तर मिळेल; पण जनावरांना चारा देखील उपलब्ध होईल. तसेच तालुका कृषी कार्यालयाच्या वतीने तालुक्यात शेतकºयांच्या क्षेत्रीय भेटी सुरु असल्याचे कृषी मंडळ अधिकारी संतोष घसिंग म्हणालेतालुक्यात एकूण पर्जन्यमान ६७५ पैकी फक्त २७५ मि. मी. झाल्याची नोंद आहे. तालुक्यात भर पावसाळ्यात उन्हाळाच असल्याची परिस्थिती आहे.

टॅग्स :BeedबीडRainपाऊसcottonकापूसAgriculture Sectorशेती क्षेत्र