शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

दारूच्या नशेत कोरोनाबाधिताने ठोकली धूम; आरोग्य पथकाने रात्र काढली जागून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 13:48 IST

आरोग्य पथक रात्रभर शोध घेत असताना रुग्णाबाबत माहिती असूनही ग्रामसुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकाने कोणतीही मदत केली नाही. 

ठळक मुद्देरुग्णाला सापडण्यासाठी आरोग्य विभागाने संपूर्ण रात्र जागून काढली.

कडा : वटणवाडी येथील दारूच्या नशेत तर्र असलेल्या 45 वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाने उपचारासाठी घेऊन जाण्यासाठी आरोग्य पथक येताच धूम ठोकल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री १० वाजेच्या दरम्यान घडली. यानंतर त्याला ताब्यात घेण्यासाठी आरोग्य पथकाने कडा येथे रात्र जागून काढली मात्र त्याला ताब्यात घेण्यात यश आले नाही. संतापजनक बाब म्हणजे आरोग्य पथक रात्रभर शोध घेत असताना रुग्णाबाबत माहिती असूनही ग्रामसुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकाने कोणतीही मदत केली नाही. 

आष्टी तालुक्यात सध्या कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर रूग्ण आढळून येत असल्याने प्रशासन जेरीस आले आहे. त्यातच बुधवारी वटणवाडी येथील  45 वर्षीय पुरूष पॉझिटीव्ह आल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात आणण्यासाठी ग्रामीण रूग्णालयातून आरोग्य पथकासोबत एक गाडी पाठवण्यात आली. परंतु, बाधित रुग्ण वटणवाडी येथे सापडला नाही. तो  दारूच्या नशेत कडा येथे फिरत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने कडा येथे त्याचा शोध सुरु केला. 

रुग्णाला सापडण्यासाठी आरोग्य विभागाने संपूर्ण रात्र जागून काढली. संतापजनक म्हणजे रुग्णाबाबत येथील ग्राम सुरक्षा समिती आणि त्याच्या नातेवाईकांना माहिती असूनही आरोग्य पथकाला कोणीच मदत केली नाही. बाधित रुग्ण दारूच्या नशेत तर्रर्र असल्याने त्याने धुम ठोकली असून अद्यापपर्यंत त्याचा शोध लागला नाही. यामुळे त्याचा संपर्क आणखी काही नागरिकांशी येऊन कोरोणा प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे. ग्राम सुरक्षा समिती आणि नागरिक यांचे सहकार्य मिळत नसल्याने काही बाधित रूग्ण उपचार न घेता पलायन करत असल्याने आरोग्य विभागासमोर कोरोना नियंत्रणाचे मोठे आव्हान आहे. 

आरोग्य पथकासोबत पोलीसांची गरज ग्रामपंचायत निहाय कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ग्राम सुरक्षा समिती नेमली आहे. पण समितीचे  आरोग्य विभागाला सहकार्य लाभत नाही. बाधित रूग्णसुद्धा पलायन करत आहेत. त्यामुळे आता आरोग्य पथकाच्या मदतीला समितीसह पोलिसांच्या एका पथकाची गरज आहे. 

धोका वाढू शकतो वटणवाडी येथील बाधित रूग्ण कड्यात फिरत असल्याचे समजले. त्याला ताब्यात घेण्यासाठी पथकाची गाडी रात्रभर फिरली. पण रुग्ण हाती लागला नाही. यावेळी आरोग्य पथकाला नातेवाईक व ग्राम सुरक्षा समितीचे सहकार्य लाभले नाही. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात कोरोनाचा धोका आणखी वाढू शकतो असा इशारा कडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन मोरे यांनी दिला. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड