शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

दुहेरी संकट ! कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या घरी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2020 17:43 IST

शहरातील जुने रेल्वे स्टेशन भागातील रुग्णाचा १७ आॅगस्ट रोजी अंबाजोगाईत  उपचार चालू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला

ठळक मुद्देरुग्णाच्या किडनीच्या आजारासाठी ठेवली होती रक्कमघरी कोणी नसल्याचा चोरट्यांनी घेतला फायदा

परळी : आठ दिवसांपूर्वी अंबाजोगाई येथील रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीचे परळीतील घर फोडून अज्ञात चोरट्याने रोख एक लाख व तीस हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना २२ आॅगस्ट रोजी जुने रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी संबंधित व्यक्तीच्या मावसभावाने येथील संभाजीनगर ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.

शहरातील जुने रेल्वे स्टेशन भागात राहणाऱ्या एका व्यक्तीचा १७ आॅगस्ट रोजी अंबाजोगाईत  उपचार चालू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान त्याच्या पत्नीला आंबाजोगाईत दिराकडे होमक्वारंटाईन करण्यात आले होते. त्यासोबतच दोन मुलेही अंबाजोगाई येथे घरी थांबले होते. त्यामुळे परळी येथे त्यांचे घर बंद होते. २२ आॅगस्ट रोजी पहाटे घराला कुलूप असल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घर फोडले. यावेळी त्यांनी कपाटातील एक लाख रुपये नगदी व सोन्याचे गंठण व कानातील झुंबर असा मुद्देमाल लंपास केला. या घटनेची माहिती मिळताच संबंधित व्यक्तीच्या मावसभावाने संभाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी संभाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब पवार, पोलीस उपनिरीक्षक चांद मेंडके यांनी भेट दिली पंचनामा केला. याप्रकरणी सोमवारपर्यंत एकही अरोपी अटक करण्यात आलेला नव्हता. तपास पोलीस उपनरीक्षक संतोष मरळ हे करीत आहेत.

किडनीच्या आजारासाठी ठेवली होती रक्कमकोरोनामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीला किडनीचा आजार होता. त्यांना उपचारासाठी पैसे लागतात म्हणून रोख रक्कम घरात कायम काढून ठेवलेली असत. त्यांना कोरोनाची लागण होण्यापुर्वीच ते लातूर येथून उपचार घेऊन आल्याची सूत्रांची माहिती आहे. उपचार घेऊन आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली होती. यात उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. यातच घरात चोरी झाल्यामुळे कुटुंबावर दुहेरी संकट ओढावले आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसBeedबीड