शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

डबल नोंदलेल्या ७१ हजार ४४१ मतदारांची होणार तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2018 00:23 IST

निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने शोधलेल्या एकसारख्या नोंदी असणाऱ्या ७१ हजार ४४१ मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एम-३ प्रकारच्या सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट अशा तीन प्रकारच्या १० हजार ४३५ इव्हीएम बीड जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या असून लवकरच त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.

ठळक मुद्देकंट्रोल युनिट, बॅलेट युनिट, व्हीव्ही पॅटच्या नवीन इव्हीएम आल्या : लवकरच पहिली तपासणी, केलेल्या मतदानाची होणार खात्री

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : निवडणूक आयोगाच्या सॉफ्टवेअरने शोधलेल्या एकसारख्या नोंदी असणाऱ्या ७१ हजार ४४१ मतदारांची तपासणी करण्यात येणार आहे. तर आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एम-३ प्रकारच्या सीयू, बीयू, व्हीव्हीपॅट अशा तीन प्रकारच्या १० हजार ४३५ इव्हीएम बीड जिल्हा निवडणूक विभागाला प्राप्त झाल्या असून लवकरच त्याची चाचणी घेण्यात येणार आहे.निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार घोषित पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांच्या दालनात बैठक झाली. यावेळी राष्टÑीय व राज्य पातळीवरील मान्यताप्राप्त पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. १ सप्टेंबर रोजी प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध झाली असून ३० आॅक्टोबरपर्यंतच्या कालावधीत दावे, हरकती स्विकारण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. प्रसिद्ध झालेल्या मतदार यादीबाबत राजकीय पक्षांना काही आक्षेप असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप पुराव्यासह मतदार नोंदणी अधिकाºयांकडे दाखल करावेत. निवडणुकीची तयारी व प्रत्यक्ष निवडणूक पारदर्शी पध्दतीने होईल याची खात्री राजकीय पक्षांनी बाळगावी असे जिल्हाधिकारी म्हणालेयावेळी एका पक्षाच्या प्रतिनिधीने काही बीएलओ त्याच गावचे रहिवासी असल्याचा मुद्दा उपस्थित करुन त्यांना बदलण्याची मागणी केली. तर याबाबत खात्री करुन त्यांना बदलण्यात येईल असे स्पष्ट केले. प्राप्त मशीनची एफएलसी करताना १ टक्के मशीनवर प्रत्येकी १२००, दोन टक्के मशीनवर १००० तर दोन टक्के मशीनवर प्रत्येकी ५०० मतदान करण्यात येणार आहे.नव्या इव्हीएमचे वैशिष्ट्यजुन्या इव्हीएममध्ये ४ बॅलेट युनिट जोडण्याची सोय होती. आता नवीनमध्ये २४ बॅलेट युनिट ( ३८४ उमेदवार ) जोडण्याची सोय आहे. या सर्व कामांची वेब कास्टींग तसेच संपूर्ण व्हिडीओ चित्रण करण्यात येणार आहे.दुबार नोंदीचे मतदार वगळणारमतदार यादीमध्ये दावे हरकती स्विकारण्याच्या कालावधीत निवडणूक आयोगाकडून सॉफ्टवेअरने एकसारख्या असलेल्या ७१ हजार ४४१ नोंदी शोधल्या. त्यानुसार मतदार तपासणीचे काम करण्यात येणार असून दुबार नोंदणी असणाºया मतदारांची नावे वगळण्यात येणार आहेत.अशी होणारमतदानाची खात्रीफर्स्ट लेवल चेकींगमध्ये ज्या उमेदवाराला मतदान केले, त्याच उमेदवाराला मतदान होते किंवा नाही याची खात्री व्हीव्हीपॅटस मशीनमधील मतदान झालेल्या चिठ्ठया मोजून करता येणार आहे. सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी स्वत: मतदान करुन पाहण्याची इच्छा व्यक्त केल्यास त्यांनाही सदरील प्रक्रियेमध्ये सहभागी करुन घेतले जाणार आहे.१५ दिवस एफएलसीआलेल्या सर्व इव्हीएम नवीन आहेत. यातील बीयू, सीयू तसेच व्हीव्हीपॅट्सची फर्स्ट लेवल चेकींग करण्यासाठी पुरवठादार बेल कंपनीचे इंजिनियर येणार आहेत. येत्या काही दिवसात बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गोदामात पहिल्या पातळीची चाचणी होणार आहे. कंपनीचे इंजिनियर, निवडणूक विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत ही चाचणी व तपासणी होणार आहे.

टॅग्स :BeedबीडBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीड