शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

कामचुकार डॉक्टरांना शिस्तीचे ‘डोस’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 23:38 IST

बीड : जिल्हा रूग्णालयातील कामचुकार डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला होता. हाच धागा पकडून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक ...

ठळक मुद्देप्रशासनाची धावपळ : आरोग्य उपसंचालकांची चार दिवसात बीड जिल्हा रुग्णालयाला दुसऱ्यांदा भेट; आता सातत्याची गरज

बीड : जिल्हा रूग्णालयातील कामचुकार डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेवर मोठा परिणाम झाला होता. हाच धागा पकडून लातूर विभागाचे आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी चार दिवसांत दुसऱ्यांदा अचानक भेट देत कामचुकार डॉक्टरांची हजेरी घेतली. नेत्यासारखे कपडे घालून रूबाब गाजविणारे डॉक्टर आज पहिल्यांदाच गळ्यात स्टेथोस्कोप घालून अ‍ॅप्रनमध्ये दिसले. उपसंचालकांच्या भेटीमुळे आरोग्य प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.मागील काही दिवसांपासून जिल्हा रूग्णालयाचा कारभार बिघडला होता. बाह्य रूग्ण तपासणी विभागात डॉक्टर बसत नव्हते. त्यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या रूग्णांना तासनतास ताटकळत बसावे लागत होते. तसेच अंतरूग्ण विभागातही डॉक्टर वेळेवर राऊंड घेत नाहीत. घेतला तर रूग्णांना काळजीपूर्वक न तपासता केवळ कागदी घोडे नाचवित होते. याच तक्रारी वाढल्याने आरोग्य उपसंचालक डॉ.एकनाथ माले यांनी सोमवारी सकाळी जिल्हा रूग्णालयाला अचानक भेट दिली. यावेळी त्यांना अस्थि व बालरोग विभागात एकही डॉक्टर आढळला नव्हता. त्यांना नोटीस बजावली होती. तसेच इतर अनेक सुचना केल्या होत्या.एकदा येऊन गेल्यानंतर उपसंचालक पुन्हा येणार नाहीत, असा समज डॉक्टरांमध्ये होता. त्यामुळे ते पुन्हा कामचुकारपणा करू लागले. मात्र गुरूवारी अचानक सकाळी ९ वाजताच डॉ.माले रूग्णालयात आले आणि सर्वांची हजेरी घेतली. रूग्णांशी संवाद साधत असतानाच कामचुकार डॉक्टरांमध्ये फोनाफोनी झाली आणि सर्वजण राऊंडच्या वेळेत गळ्यात स्टेथोस्कोप आणि अंगात अ‍ॅप्रन घालून तयार होते. रूग्णांना अरेरावी करणारे डॉक्टरही गुरूवारी आपुलकीने उपचार करताना दिसून आले. यात असेच सातत्य ठेवावे, अशी मागणी सर्वसामान्यांमधून होत आहे.यावेळी बीडचे अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुखदेव राठोड, डॉ.सतीश हरीदास, डॉ.आय.व्ही. शिंदे, मेट्रन मंदा खैरमोडे, परिसेविका संगिता सिरसाट आदी त्यांच्यासमवेत होते.दरम्यान, हा दबदबा कायम ठेवण्यासाठी आणि रुग्णांना तत्पर आरोग्य सेवा देण्यासाठी वरिष्ठांनी कामचुकार डॉक्टरांचे कान टोचून चांगले काम करणाºयांचे स्वागत करणे गरजेचे आहे.

टॅग्स :BeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड