बीड : डॉक्टरांच्या समस्या पक्षश्रेष्ठींकडे मांडणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी डॉक्टर सेलचे नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष डॉ. रमेश घोडके यांनी केले.
जिल्ह्यातील अॅनोरेक्टल सर्जन डॉ. रमेश घोडके यांची नुकतीच राष्ट्रवादी डॉक्टर सेलच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली, त्यानंतर ते बोलत होते.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या परवानगीने डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे व जिल्हाध्यक्ष डॉ. बालाजी जाधव यांनी डॉ. घोडके यांची नियुक्ती केली. डॉक्टर सेलने नेहमीच डॉक्टरांच्या समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रवादी पक्षाच्या मदतीने प्रयत्न केला आहे. डॉक्टरांना नेहमीच रुग्णांच्या जीवन-मरणाशी लढावे लागते. अशा वेळेस डॉक्टरांना संरक्षण देणारा अतिशय कडक कायदा नुकताच अस्तित्वात आला आहे. शिवाय डॉक्टर व रुग्ण यांच्यातील नाते घट्ट होण्यासाठी वेगवेगळी शिबिरे वरुग्णहिताचे सामाजिक उपक्रम राष्ट्रवादी डॉक्टर सेलतर्फे घेतले जातात.
डॉ. रमेश घोडके यांनी नीमा डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष म्हणून सक्रिय काम केले आहे. सामाजिक कार्यात ते अग्रेसर असतात. यापूर्वी त्यांनी तसेच दरवर्षी रोटरी क्लब ऑफ बीडच्या शस्त्रक्रिया शिबिरामध्ये डॉ. रमेश घोडके व डॉ. उर्मिला घोडके यांचा सक्रिय सहभाग असतो. आरोग्य व सामाजिक सेवेची दखल घेऊन डाॅक्टर सेलच्या बीड जिल्हा उपाध्यक्षपदी त्यांची निवड केली आहे.
===Photopath===
260321\26bed_4_26032021_14.jpg
===Caption===
राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा उपाध्यक्षपदी डॉ. रमेश घोडके यांची निवड झाली.