शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बीडमध्ये डॉक्टरांची हलगर्जी; रूग्णाच्या मृत्यूने तणाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:23 IST

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रूग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात परिसरात आक्रोश केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करून संबंधित डॉक्टर, कर्मचा-यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ समिती नेमण्यात आली आहे.

ठळक मुद्देजिल्हा रूग्णालयातील घटनागुन्हा दाखल करण्याची मागणी

बीड : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आमच्या रूग्णाचा मृत्यू झाला, असा आरोप करीत नातेवाईकांनी जिल्हा रूग्णालयात परिसरात आक्रोश केला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजता घडली. नातेवाईकांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे तक्रार करून संबंधित डॉक्टर, कर्मचा-यांवर गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीसाठी तात्काळ समिती नेमण्यात आली आहे.

कैलास नरहरी सरवदे (४६ रा.नवा मोंढा, बीड) असे मयत झालेल्या रूग्णाचे नाव आहे. सरवदे यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना मंगळवारी रात्री ८ वाजता जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कट्टे यांनी त्यांची तपासणी करून त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करून घेतले. त्यानंतर काही वेळात लगेच सरवदे यांच्या छातीत दुखू लागले. नातेवाईकांनी डॉ.कट्टे यांच्याकडे धाव घेतली. त्यांनी तपासले असता फिजिशिअयला कॉल करण्याचे सांगितले. त्याप्रमाणे कर्तव्यावर असणारे डॉ. बाळासाहेब टाक यांना रूग्णालयाकडून संपर्क करण्यात आला. परंतु डॉ.टाक तब्बल दीड तास उशिराने रूग्णालयात आल्याचे नातेवाईकांचे म्हणने आहे.

त्यानंतर टाक यांनी तपासणी करून काही औषध बाहेरून आणण्यास सांगितले. काही वेळानंतर सरवदे यांच्या हालचाली बंद झाल्या. पुन्हा टाक यांना बोलाविले असता त्यांनी रूग्णास मयत घोषित केले. वास्तविक पाहता डॉक्टर १० ते १५ मिनीटांत आले असते तर तात्काळ औषधोपचार करून रूग्ण वाचला असता.

तसेच वैद्यकीय अधिकारी यांनीही आपली जबाबदारी झटकून रूग्णाची तपासणी करण्यास दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवार्ईकांनी केला. डॉक्टरांच्या हालगर्जीपणामुळेच आमचा रूग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी करीत रूग्णालयासमोर ठिय्या मांडला होता.

डॉक्टरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतल्याने काही वेळ तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत नातेवाईकांना अश्वासन दिले. बुधवारी सकाळी शवविच्छेदन झाले. त्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. फिजिशियन डॉ. बाळासाहेब टाक, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय कट्टे यांच्याशी वारंवार भ्रमणध्वनीवरुन संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही.नातेवाईकांचा संताप : डीएमओंचा काढता पायअतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.संजय पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार सरवदे रूग्णालयात दाखल झाले तेव्हा डॉ.कट्टे हे वैद्यकीय अधिकारी होते. रात्री ९ वाजेनंतर डॉ.राठोड यांची ड्यूटी होती. तर फिजिशिअन म्हणून डॉ.टाक होते. दरम्यान, सरवदे यांना मृत घोषित केल्यानंतर नातेवाईक डॉक्टरांविरोधात आक्रमक झाले. हा संताप पाहून डिएमओ व इतर कर्मचाºयांनी रूग्णालयातून काढता पाय घेतला.

लवकरच अहवाल येईलसरवदे यांच्या मृत्यूबद्दलत तक्रार आली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नेमली आहे. लवकरच याचा अहवाल येईल. त्यानंतर नेमके कारण स्पष्ट होईल.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड