शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

रुग्णावर उपचार करण्यास डॉक्टरांची टाळाटाळ; बीड जिल्हा रुग्णालयातील प्रकार 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2018 18:42 IST

वरिष्ठांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काही डॉक्टर रुग्णांना तुच्छ वागणूक देत उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत.

बीड : येथील जिल्हा रुग्णालयाचा कारभार पूर्णपणे ढेपाळला आहे. वरिष्ठांच्या दुर्लक्षाचा फायदा घेत काही डॉक्टर रुग्णांना तुच्छ वागणूक देत उपचार करण्यास टाळाटाळ करीत आहेत. आज दुपारी एकच्या सुमारास अपघात विभागातील एका वैद्यकीय अधिकाऱ्याने रुग्ण न पाहताच औषधी लिहून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मागील काही महिन्यांपूर्वी जिल्हा रुग्णालयाचा कारभार सुधारला होता. सुरक्षित मातृत्व अभियानसह इतर उपक्रमांमध्ये जिल्हा रुग्णालय अव्वल राहिले. त्यामुळे प्रतिमाही उंचावली होती. राज्यात जिल्ह्याचे नाव झाले. परंतु मागील काही दिवसांपासून कारभार जैसे थे झाल्याचे पाहवयास मिळत आहे. नियमित डॉक्टर शिकाऊ डॉक्टरांवर जबाबदारी सोपूवन इतरत्र फिरत असल्याचा प्रकार समोर आला होता. यावर उपाययोजना होत नाही तोच पुन्हा एकदा अपघात विभागातील एका डॉक्टराने रुग्णावर उपचार करण्यास टाळाटाळ केली. विनंती केल्यानंतर संबंधित डॉक्टरने रुग्ण न पाहताच रागाच्या भरात औषधी लिहून वॉर्ड क्रमांक ८ मध्ये दाखल होण्यास सांगितले. हा प्रकार अतिशय संतापजनक असल्याने सदरील रुग्णाने जिल्हा शल्य चिकित्सकांकडे रितसर तक्रार केली आहे.

रुग्णालयाची प्रतीमा मलीनदरम्यान, मागील काही दिवसांपासून अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने जिल्हा रुग्णालयाची प्रतिमा मलीन होत आहे. याला केवळ कामचुकार डॉक्टरच जबाबदार आहेत. काही डॉक्टर मात्र प्रामाणिकपणे सेवा देत असल्याचे दिसून येते. रुग्णांवर उपचार करण्यास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे.

कारवाई केली जाईलरुग्णांवर उपचार करण्यात टाळाटाळ केली असेल तर तात्काळ चौकशी करुन कारवाई केली जाईल. दर्जेदार व तत्पर सेवा देण्यासाठी आम्ही तत्पर आहोत. काही डॉक्टरांकडून असे प्रकार होत असतील तर कोणासही पाठिशी घातले जाणार नाही. थेट कारवाई केली जाईल.- डॉ. अशोक थोरात,जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडmedicineऔषधंhospitalहॉस्पिटल