शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

डॉक्टरांना सुट, रूग्णांची लुट; बीड जिल्हा रूग्णालयात व्यसनमुक्तीच्या कारवाईत दुजाभाव 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 16:26 IST

जिल्हा रूग्णालय किंवा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाणाऱ्यास दंड आकारला जात आहे.

ठळक मुद्दे रूग्ण, नातेवाईकांवर कारवाईम्हणे...डॉक्टरांवर कारवाईचे अधिकार नाहीत

बीड : जिल्हा रूग्णालय किंवा परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाणाऱ्यास दंड आकारला जात आहे. मात्र येथे कारवाईत दुजाभाव केला जात असून रूग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांना सुट देऊन सर्वसामान्य रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून दंड आकारला जात आहे. केवळ कारवाईचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी तंबाखु नियंत्रण विभागाकडून हा प्रकार केला जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.

तंबाखुजन्य पदार्थ खाऊन रुग्ण नातेवाईकांसह रुग्णालयात कार्यरत डॉक्टर व इतर कर्मचारी भिंतीवर थुंकतात. त्यामुळे जिल्हा रूग्णालयातील प्रत्येक भिंत पिचकऱ्यांनी रंगीबेरंगी झालेली दिसते. हे टाळण्यासाठी व स्वच्छता रहावी, तसेच नागरिकांचे आरोग्य अबाधित रहावे या उद्देशाने रुग्णालय व परिसरात तंबाखुजन्य पदार्थ खाणाऱ्यावर कारवाई केली जाते. त्यांच्याकडून दंडही वसूल केला जातो.

राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत पथक नियुक्त केले असून, त्यांच्याकडून कारवाईत दुजाभाव होत असल्याचे बुधवारी समोर आले आहे. डॉक्टर व रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना बगल देत केवळ गरजू रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून दंड वसूल केला जात असल्याचे समोर आले आहे. पथकाच्या या दुजाभावामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे. आता याच पथकाची चौकशी करण्याची मागणी जोर धरु लागली आहे. काही नागरिकांनी याबाबत तक्रारी करणार असल्याचे सांगितले.

जनजागृती कागदावरचराष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनापासून मुक्त होण्यासाठी जनजागृती करण्याचे आदेश आहेत. मात्र, जिल्हा रुग्णालयातील विभाग केवळ कागदोपत्री जनजागृती दाखवत आहे. प्रत्यक्षात मात्र कसलाच रिझल्ट नसल्याचे समोर आले आहे.

म्हणे...डॉक्टरांवर कारवाईचे अधिकार नाहीत !डॉक्टरांवर कारवाई अधिकार नाहीत असे कारण सांगत संबंधित अधिकाऱ्यांनी डॉक्टरांची बाजू घेतली. हेच डॉक्टर सध्या भिंती रंगवत आहेत. अधिकाऱ्याच्या या दुजाभावामुळे संशय व्यक्त होत असून, दोघांमध्ये संगनमत असल्याचा आरोप केला जात आहे.

एका दिवसात केवळ १६ कारवायाबुधवारी ६ ते ७ लोकांचे पथक कारवाईसाठी फिरत होते. दिवसभरात केवळ १६ कारवाया करुन ६५० रुपयांचा दंड वसूल केला. यातील १२ कारवाया या सर्वसामान्यांवर होत्या. उर्वरित ४ कारवाया वर्ग - ४ च्या कर्मचाऱ्यांवर झाल्या. यामध्ये एकाही डॉक्टराचा समावेश नाही हे विशेष. यावरुन पथकाकडून होणारा दुजाभाव दिसून येतो.

कोणालाही सुट नाही रुग्णालयात राऊंड घेताना मी स्वत: कारवाया केलेल्या आहेत. तसेच जनजागृतीही केली जाते. रुग्ण, नातेवाईक असो अथवा डॉक्टर, कर्मचारी यापैकी कोणालाही सूट दिली जाणार नाही. दुजाभाव न करता सर्वांवर कारवाई केली जाईल. तसे आदेश दिले जातील. नागरिकांनीही सहकार्य करावे.- डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्य चिकित्सक, बीड

टॅग्स :Beed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीडdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटल