गेवराई : तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता गेल्या काही दिवसांपूर्वी बेड शिल्लक नव्हते तर अनेक औषधींचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत होता. अशावेळी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन ही गरज पूर्ण केली. १ जून रोजी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती या शिक्षक संघटनेच्या वतीने कोविड रुग्णांसाठी उपजिल्हा रुग्णालयास २० नेब्युलायजर मशीन व २० वाफ घेण्याच्या मशीन देण्यात आल्या. यावेळी डाॅक्टरसह शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आपणही समाजाचे काही देणे लागतो, या उद्देशाने येथील उपजिल्हा रुग्णालयास काही साहित्याची गरज पडत होती. यासाठी तालुक्यातील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक भारती या शिक्षक संघटना धावून आली व या संघटनेच्या वतीने येथील उपजिल्हा रुग्णालयातील कोविड रुग्णांसाठी हे साहित्य वाटप करण्यात आले.
यावेळी तहसीलदार सचिन खाडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. महादेव चिंचोळे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, शिक्षक संघटनेचे कैलास पट्टे, शांताराम दिवेकर, महादेव कऱ्हे, दिलीप जगताप, राम पौळ, दत्ता मडके, गायकवाड, विशाल कुलकर्णी, जगन्नाथ जाधव, सुभाष निकम, धर्मराज आहेर, कडुदास कांबळे, राजेंद्र बरकसे, बाळासाहेब सानप, पप्पू गोलेच्छा, सुभाष मुळे, सुभाष सुतार, सखाराम शिंदे, भागवत जाधव, अभिजित ठाकूरसह अनेकजण उपस्थित होते. या साहित्यामुळे येथील रुग्णाला फायदा होणार आहे.
===Photopath===
010621\20210601_110101_14.jpg