बीड : प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.बीड नगरपरिषदेच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना धनादेशाचे वितरण मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आले. नगराध्यक्ष डॉ.भारतभूषण क्षीरसागर, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, एचडीएफसी बँकेचे व्यवस्थापक विजय नाईक, मध्यवर्ती बँकेचे दिलीप परदेशी, क्र ेडाईचे समीर काझी, न.प.चे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर आदी उपस्थित होते.याप्रसंगी नगराध्यक्ष डॉ.क्षीरसागर म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेतून आज १०९ पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळत असला तरीही अजून १९०० लाभार्थ्यांना शासनाकडून मंजुरी मिळाली आहे. त्यांना येत्या आठ ते दहा दिवसांत लाभ दिला जाईल. याचबरोबर शहराच्या खंडेश्वरी, धानोरा रस्ता आदी भागांवर आवास योजनेतून घरकुल बांधण्यासाठी नियोजन केले जात आहे. सध्या ड्रेनेज पाणीपुरवठा आणि रस्त्यांची कामे सुरू असून त्याचा शहराला फायदा होईल, असे त्यांनी सांगितले.मुख्याधिकारी दोरकुळकर यांनी प्रास्ताविक करताना लाभार्थ्यांच्या मंजूर लाभातील ४० हजारांचा पहिला हप्ता दिला जात असल्याचे सांगितले.याप्रसंगी क्षीरसागर यांच्या हस्ते ७२ पात्र लाभार्थ्यांपैकी ५ जणांना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेशाचे वितरण केले व इतर पात्र व्यक्तींना कार्यक्रमानंतर धनादेश देण्याची कार्यवाही सुरु केली होती. शहरातील ५ हजार नागरिकांनी आॅनलाइन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी १०९ कर्ज मंजूर लाभ देण्यात येत असून याव्यतिरिक्त १९०० अर्ज शासनाकडून मंजूर झाले आहेत. यामध्ये प्रत्येकी अडीच लाख रुपयांचा लाभ मंजूर आहे. त्यापैकी लक्ष्मीकांत आडाणे, गणेश ओव्हाळ, अल्ताफ इब्राहिम बागवान, कस्तुराबाई शिंदे व अंकुश चित्रे यांना रोहयो व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या हस्ते धनादेश देण्यात आले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ७२ लाभार्थ्यांना धनादेश वितरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:00 IST
प्रधानमंत्री आवास योजना ही सरकारची महत्वकांक्षी योजना आहे, २०२२ पर्यंत या योजनेतून सगळ्यांना घर दिले जाईल. बीडमधील प्रत्येक गरीब बेघर व्यक्तीस स्वत:च्या हक्काचे घरकुल देण्याचे काम यातून केले जात असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे रोजगार हमी योजना व फलोत्पादनमंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले.
प्रधानमंत्री आवास योजनेच्या ७२ लाभार्थ्यांना धनादेश वितरण
ठळक मुद्देजयदत्त क्षीरसागर : प्रत्येक गरीब व्यक्तीस स्वत:चे घरकुल मिळणार