शहरं
Join us  
Trending Stories
1
Aishanya Dwivedi : Video - "BCCI पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर विसरलं; आपण पाकिस्तानला ही संधी का देतोय?"
2
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...
3
"आदित्य ठाकरे बुरख्यात लपून भारत-पाकिस्तान मॅच पाहतील"; मंत्री नितेश राणेंची बोचरी टीका
4
'या' देशाने मंत्रिमंडळात आणला AI मंत्री ! राजकारणाच्या इतिहासात पहिल्यांदाच असा प्रयोग
5
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
6
वर्गमित्रांचा प्रताप! झोपेत असताना डोळ्यात टाकलं फेविक्विक; ८ विद्यार्थ्यांचे चिकटले डोळे अन्...
7
पत्नीला ५ गोळ्या घातल्या, क्राइम सीनवरून फेसबुक लाईव्ह केलं; पती म्हणाला, "हिचे बॉयफ्रेंड पळून गेले..." 
8
शुबमन गिलच्या फोटोपेक्षा हातातल्या घड्याळ्याची रंगली चर्चा, किंमत ऐकाल तर अवाक् व्हाल...
9
क्रूरतेचा कळस! मिठाई ताजी नाही हे ऐकताच दुकानदार संतापला; १० वर्षांच्या मुलाला बेदम मारहाण
10
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात जन्मलेल्या बाळांचे भविष्य कसे असते? शुभ की? ज्योतिष शास्त्राने केला उलगडा!
11
४०००० कोटींचे उत्पन्न, ७० लाख नोकऱ्या; नितीन गडकरींनी दिला कमाईचा नवा मंत्र, कुणाला फायदा?
12
उमेश सहकलाकार नसता तर मी हा सिनेमा केला नसता, प्रिया बापटने सांगितलं कारण
13
२, ३, ४BHK घर बांधायचेय? जीएसटीचा किती फायदा होणार? सिमेंट, सळ्या, टाईल्स कितीने स्वस्त झाल्या
14
गर्लफ्रेंडने ब्लॉक केलं, प्रेमभंग जीवावर बेतला, तरुणाने उचलले टोकाचे पाऊल; उपचारादरम्यान मृत्यू
15
१०% नं घसरलाय हा शेअर, पण अजूनही IPO च्या किंमतीपेक्षा ६०% नं अधिक; काय म्हणाले एक्सपर्ट?
16
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
17
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
18
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
19
अंकिता लोखंडेचा नवरा रुग्णालयात दाखल; हाताला ४५ टाके अन्... मित्राने शेअर केली पोस्ट
20
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल

बीडमध्ये रस्ते बनले वाहनतळ; विस्कळीत वाहतुकीने अपघातास निमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 11:59 IST

मागील काही दिवसांपासून शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. यामुळे सर्वसामान्य वाहनधारकांसह पादचा-यांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. हातगाड्यांसह धनदांगड्यांनी रस्त्यावर केलेली अतिक्रमणे, बंद सिग्नल व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहतूक व्यवस्था बिघडली आहे. एवढी गंभीर परिस्थिती असतानाही नगर पालिका व वाहतूक शाखा पोलिसांकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जात असल्याने तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देअतिक्रमण, बंद सिग्नल व अस्ताव्यस्त पार्किंगमुळे समस्या

बीड : बीड शहरातून सोलापूर-धुळे हा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने मोठ्या प्रमाणात छोट्या-मोठ्या वाहनांची वर्दळ असते. त्यातच मागील काही दिवसांपासून बायपास रस्ता सुरू झाल्याने काही मोठी वाहने शहराबाहेरून धावतात. तरीही एमआयडीसी, मोंढा व इतर कामांसाठी शहरात येणा-या मोठ्या वाहनांची संख्या भरपूर आहे. जालना रोडवर साठे चौक परिसरात गेवराईकडे जाणारी वाहने मुख्य रास्त्यावर रिक्षा, जीप उभा करून प्रवाशांची अवैध वाहतूक करतात. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक केली जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. विशेष म्हणजे याठिकाणी वाहतूक शाखेचे दोन पोलीस कर्मचारी नियमीत कर्तव्यावर असतात. असे असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून खाजगी वाहनधारक अवैध प्रवासी वाहतूक करीत असल्याचे दिसून येते.

साठे चौकासह छत्रपती शिवाजी महाराज चौक, नगर रोड, नगर नाका, जिल्हा रूग्णालय परिसर, तेलगाव नाका, बार्शी नाका, भाजी मंडई आदी भागातही यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. याठिकाणी पोलीस कर्मचारी नियुक्त असतानाही सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात असल्याचे दिसते.

रस्ते बनले वाहनतळबीड शहरात वाहन पार्किंग करण्यासाठी हक्काची ठिकाणे नाहीत. त्यामुळे नागरिक सर्रास आणि बिनधास्तपणे रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे मोठे रस्तेही अरूंद बनले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, बसस्थानक परिसर, नगर पालिका, पोस्ट आॅफिस, पांगरी रोड या भागात वाहने रस्त्यावरच उभी असतात. या गर्दीतून मार्ग काढताना मोठ्या वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या वाहनांवर कारवाई करून त्यांना हक्काची पार्किंग उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.

पालिकेकडे पाठपुरावा; पण सहकार्य नाहीशहरातील अतिक्रमणे, सिग्नल, पार्किंग आदींच्या प्रश्नांवर पोलिसांनी वारंवार बीड नगर पालिकेला कळविले आहे.परंतु त्यांच्याकडून अद्याप याची दखल घेतली गेली नाही. पोलिसह केवळ स्मरणपत्रे देऊन आपली जबाबदारी झटकत आहेत. याचा कायमस्वरूपी पाठपुरावा होत नसल्याने पालिकाही याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसते.

पोलीस सुस्त अन नागरिकही जबाबदारीबाबत अनभिज्ञचौकाचौकात वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी नियूक्त असतात. परंतु त्यांच्याकडून वाहतूक सुरळीत करण्यासाठी अपेक्षेप्रमाणे प्रयत्न केले जात नाहीत. त्यातच नागरिकांनाही आपल्या जबाबदारीचे भान राहिलेले नसते. सर्रासपणे वाहतूक नियमांचे उल्लंघण त्यांच्याकडून केले जात आहे. पोलिसांएवढेच याला वाहनधारकही जबाबदार असल्याच्या भावना व्यक्त होत आहेत.

सीओंचा भ्रमणध्वनी बंदयाबाबत नगर पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.धनंजय जावळीकर यांना भ्रमणध्वणीवरून वारंवार संपर्क केला. परंतु तो होऊ शकला नाही. त्यामुळे त्यांची बाजू समजली नाही. पालिकेतील विश्वसनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार ते महत्वाच्या मिटींगसाठी बाहेर असल्याचे सांगण्यात आले.वाहतूक कोंडी बनली डोकेदुखीशहरातील प्रत्येक रस्त्यावर सध्या वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. या कोंडीतून मार्ग काढताना सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये वृद्ध, लहान मुलांना आधिक त्रास सहन करावा लागत आहे.

लोकप्रतिनिधी, संघटनांकडून डोळेझाकजालना रोड अथवा इतर रस्त्यावर अपघात झाला आणि त्यात बळी गेला की लोकप्रतिनिधी, संघटना जाग्या होतात आणि आंदोलने करून प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न करतात.दोन-चार दिवस प्रसिद्धी मिळाली की, पुन्हा हे सर्व सुस्त होतात आणि परिस्थिती जैसे थे होऊन आणखी एका अपघातास निमंत्रण मिळते. केवळ ‘चमकोगिरी’ करण्यासाठीच संघटना व लोकप्रतिनिधी आवाज उठवित असल्याच्या संतप्त प्रतिक्रिया पुढे येऊ लागल्या आहेत.अपघात घडण्यापूर्वी अतिक्रमणांसह इतर समस्या मार्गी लावण्यासाठी आवाज उठविण्याची गरज निर्माण झाली आहे.

अतिक्रमणधारकांना पालिकेचे अभयजालना रोड, भाजी मंडई, नगर रोडसह शहरातील अंतर्गत छोट्या-मोठ्या रस्त्यांवर सर्रासपणे हातगाड्यावाल्यांसह धनदांडग्यांनी अतिक्रमणे केली आहेत.ही अतिक्रमणे हटविण्यास पालिकेकडून ‘अर्थ’पूर्ण दूर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस अतिक्रमणांची संख्या वाढत असल्याचे दिसते.

जिल्हाधिका-यांच्या आदेशाला केराची टोपलीशहरातील विस्कळीत वाहतूक पाहिल्यानंतर जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी शहरातील बंद सिग्नल तत्काळ सुरू करण्याच्या सुचना नगर पालिकेला दिल्या होत्या.परंतु पालिकेने त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविल्याचे दिसते. अद्याप एकही सिग्नल सुरू झालेले दिसत नाही. यामुळेच शिवाजी चौक, साठे चौक व इतर ठिकाणी वाहने सुसाट जात आहेत. यामुळे अपघात घडत असल्याचे दिसते.