शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

गुरूंच्या विरहाने शिष्याने तोडला दम !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव(जि.बीड): येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्व मठाधिपती सद्गुरू श्री तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव(जि.बीड): येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे पूर्व मठाधिपती सद्गुरू श्री तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य महास्वामीजी माजलगावकर महाराज यांचे सेवेकरी विलास विठ्ठलअप्पा शेटे (वय ४५) यांना गुरूंचा विरह सहन न झाल्याने हृदयविकाराने त्यांचे शनिवारी दुपारी १.४० वाजता निधन झाले. माजलगावकर महाराजांचा समाधी सोहळा उरकल्यानंतर काही वेळातच समाधीस्थळी विलासअप्पा शेटे यांनी जगाचा निरोप घेतला.

शुक्रवारी दुपारी १ वाजता माजलगाव मठाचे मठाधिपती सद्गुरू माजलगावकर महाराज शिवचरणी लीन झाले. त्यांचा समाधी सोहळा शनिवारी सकाळी ११ वाजता माजलगाव मठामध्ये करण्यात आला. हा समाधी सोहळा पार पडल्यानंतर विलासअप्पा शेटे यांना हृदयविकाराचा त्रास होऊ लागला. तातडीने त्यांना येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता येथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांनी समाधीस्थळीच दम सोडला असल्याचे भाविक सांगत होते.

गेल्या अनेक वर्षांपासून विलासअप्पा शेटे कुठल्याही अपेक्षेविना नि:स्वार्थ भावनेने माजलगाव मठाची सेवा करीत होते. त्यांची काम करण्याची हातोटी आणि विलक्षण चपळता माजलगावकर महाराजांना भावल्याने, अगदीच कमी काळात ते त्यांचे विश्वासू सेवेकरी झाले. आज त्यांच्या अशा अचानक जाण्याने समग्र वीरशैव समाज पुन्हा एकदा शोकसागरात बुडाला असून, केवळ दोनच दिवसात हा दुसरा मोठा धक्का या समाजाला सहन करावा लागला आहे.

...

110921\purusttam karva_img-20210911-wa0020_14.jpg

सेेवेकरी विलास शेटे यांचे निधन