शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाच्या झळा; पिण्याच्या पाण्यासाठी दिंद्रुडकरांचे जलसमाधी आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 19:31 IST

अवैधरीत्या चालू असलेल्या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर कारवाई करण्याची धारुर प्रशासनाकडे जवळपास दीड महिन्यापूर्वीपासून मागणी केली होती.

दिंद्रुड (जि. बीड) : प्रशासनाकडून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न न सुटल्याने बीडच्या माजलगाव तालुक्यातील दिंद्रुड ग्रामस्थांनी बुधवारी तब्बल तीन तास जलसमाधी आंदोलन आंदोलन केले व पाण्यात बसून प्रशासनाच्या नैराश्यपूर्ण भूमिकेविरोधात घोषणा दिल्या.

माजलगाव तालुक्यातील सर्वात मोठे सदन गाव म्हणून दिंद्रुड सर्वपरिचित आहे. १८ ते २० हजार लोकसंख्या असलेल्या दिंद्रुड गावाला येथून ३ कि. मी. अंतरावर असलेल्या चाटगाव शिवारातील तलावातून पाणीपुरवठा होतो. सद्य:परिस्थितीत या तलावात केवळ १७.२ जिवंत साठा उपलब्ध आहे. वेळीच पाणी आरक्षित न केल्यास पुढील महिन्यात दिंद्रुडकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ येण्याची शक्यता आहे.

दिंद्रुडचे सरपंच अजय कोमटवारसह ग्रामपंचायत सदस्यांनी धारुर तालुक्यातील चाटगावच्या तलावातून अवैधरीत्या सुरू असलेल्या पाणी उपसा व येत्या काही दिवसांत दिंद्रुडसाठी निर्माण होणारा खंडित पाणीपुरवठा यामुळे पाणी आरक्षित करत अवैधरीत्या चालू असलेल्या पाणी उपसा करणाऱ्या विद्युत पंपावर कारवाई करण्याची धारुर प्रशासनाकडे जवळपास दीड महिन्यापूर्वीपासून मागणी केली होती.

धारुर तहसीलने मागणीची कुठलीही दखल न घेतल्यामुळे बुधवारी दिंद्रुड ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांनी तलावात जलसमाधी आंदोलन केले. सरपंच अजय कोमटवार, सदस्य अतुल चव्हाण, भारत गौंडर,नारायण चांदबोधले, राम उबाळे, रमेश शिंदे, मिलिंद देशमाने, भाऊ सुरवसे, हनुमान सोळंकेे आदी ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी पाण्यात उतरले होते. धारुर तहसीलचे नायब तहसीलदार प्रकाश गोरड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत, समिती स्थापन करीत योग्य ती कारवाई करण्याची हमी दिली. वरिष्ठांच्या आदेशानुसार लेखी कारवाईच्या आश्वासनानंतर दिंद्रुडकरांनी आंदोलन मागे घेतले.

चाटगावच्या तलावातील पाण्यावर दिंद्रुडकरांचा हक्क नाही, चाटगावच्या शेतकऱ्यांचे शेतीसाठी पाणी बंद केल्यावर शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याची वेळ येईल. प्रशासनाने विचारपूर्वक निर्णय घ्यावा.-केशव केकान, शेतकरी, चाटगाव

टॅग्स :WaterपाणीBeedबीड