शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

गावात खरंच एवढ्या पाण्याच्या टँकर खेपा झाल्या का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:02 IST

लोकप्रतिनिधी, गुत्तेदाराने गावाला एवढे पाणी पाजले का? शेतकऱ्यांनो, अधिग्रहणाचे पैसे येऊ लागले, ते कुणालाही देऊ नका अमोल जाधव ...

लोकप्रतिनिधी, गुत्तेदाराने गावाला एवढे पाणी पाजले का? शेतकऱ्यांनो, अधिग्रहणाचे पैसे येऊ लागले, ते कुणालाही देऊ नका

अमोल जाधव

नांदुरघाट : २०१९ मध्ये काही गावात पाणीटंचाइ लक्षात घेता पाणी टँकर सुरू केले होते. त्यासाठी गावातील बोर, विहीर अधिग्रहण करून तेथून पाणी गावाला दिले होते; परंतु वास्तवात त्या ठिकाणाहून किंवा गावात एवढ्या टँकरच्या खेपा खरंच केल्या आहेत की नाही, हे जनतेने ठरवायचे. आपल्या पुढाऱ्यांनी गुत्तेदाराच्या संगनमताने गावाला पाणी पाजण्याऐवजी पळवले का, असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे. २०१९ मध्ये काही टंचाईच्या काळात शेतकऱ्यांचे बोर व विहीर शासनाने अधिग्रहण केले होते. प्रतिदिन सहाशे रुपयेप्रमाणे शेतकऱ्यांना चेकद्वारे पैसे येऊ लागले आहेत. काही रक्कम सुरुवातीला मिळाली आहे; परंतु जवळपास ८० टक्के रक्कम तशीच शासनाकडे होती. त्यातील बहुतांश रक्कम येऊ लागली आहे परंतु गाव पुढारी व मध्यस्थी दलाल हे तो चेक घेऊन परस्पर उचलण्याचा प्रकार होऊ शकतो. तसेच चेक निघण्यासाठी कोणालाही पैसे द्यावे लागत नाहीत.

महत्त्वाचे म्हणजे गावात टँकरने खरंच तेवढ्या खेपा केल्या आहेत का, हे प्रत्येक गावातील सुजाण नागरिकांनी पाहिले पाहिजे. जर गावात टँकर न येता पैसे उचलत असतील तर जनतेनेच त्या गाव पुढाऱ्यांना जाब विचारला पाहिजे.

आलेल्या रक्कमा पुढीलप्रमाणे नांदुरघाटमध्ये १९ एप्रिल २०१९ पासून टॅंकर सुरू केले. ते ३० सप्टेंबर २०१९ पर्यंत सुरू होते. म्हणजे जवळपास सहा महिन्याचा कालावधी टॅंकरने गावाला पाणीपुरवठा होता म्हणजे १६५ दिवस ५ टँकरने पाणीपुरवठा केला. हे टँकर भरण्यासाठी पाच शेतकऱ्यांचे बोर, विहीर अधिग्रहण केले होते. यामध्ये हरी राम जाधव (९९,००० रुपये), भागवत खोमणे (९९,००० रुपये), दत्तू सागरे (९७,२०० रुपये), दिलावर शेख (९६,००० रुपये), शेख नसीर बशीर (९४,२०० रुपये, सर्व रा. नांदुरघाट) या शेतकऱ्यांना टँकर भरून दिले म्हणून पाण्याचे पैसे त्यांच्या खात्यावर काही आले व येऊ लागले.

तसेच नांदुरघाट सर्कलमधील हंगेवाडी येथे पाणी पुरवठा करण्यासाठी १४६ दिवस दोन टँकर पाणीपुरवठा केला. त्यासाठी उद्धवराव रामभाऊ जाधव (६९,०००) व सोमीनाथ शाहू हंगे (८७,६००) यांचे अधिग्रहण केले. त्यांना एवढी रक्कम शासनाने मंजूर केलेली आहे.

तसेच माळेवाडीत मधुकर अभिमान गदळे (८८,२०० रु), सांगवीत मच्छींद्र दत्तात्रेय धस (९१,८००), नारेवाडीत त्रिंबक ज्ञानोबा शेळके (१३,८००) असे पैसे आहेत. नाहोली येथे तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. त्यासाठी गहिनीनाथ बाबुराव बिक्कड ६४,२००, दत्तात्रेय मुळे दैठणा १५,६००, नवनाथ भीमा केदार ४३,२०० असे पैसे आहेत.

नाहोली येथे १०७ दिवस टॅंकरने पाणीपुरवठा केला. तसेच शिरूर घाट येथे विशेष म्हणजे एकाच टॅंकरने (MHEB 7624) सर्व सात उद्‌भवावरून खेपा केल्याचे दिसून आले. यामध्ये श्यामराव सुखदेव सांगळे १,२००, कुमराबाई श्रीरंग कदम राजेगाव १६,२००, प्रभाकर आश्रुबा शिंदे ३८,४००, संदिपान रामभाऊ फाटक ३,६००, अण्णासाहेब गोपीनाथ केदार ३७,२००, सुषेन नारायण गीते ६९,०००, महादेव भगवान केदार ४९,८०० या सात ठिकाणाहून शिरूरघाटला एकाच टॅंकरने पाणीपुरवठा केला. वरील सर्व रक्कम शेतकऱ्यांना टँकर भरले म्हणून पाण्याचे पैसे आले आहेत. यातील काही रक्कम सुरुवातीला देण्यात आली; परंतु बहुतांश रक्कम राहिली आहे. ती लवकरच मिळायला सुरुवात होणार आहे व चालू झाली आहे. वरील शेतकऱ्यांनी आपली रक्कम कोणालाही देऊ नये. तसेच गावकऱ्यांनी त्या गावात खरंच एवढ्या टँकरच्या खेपा झाल्या होत्या का, याचे परीक्षण करणे गरजेचे आहे.