धारूर येथे समाजकल्याण विभागाच्या वसतिगृहात १०० रुग्णांसाठी, तर जि. प. मुलींच्या वसतिगृहात ६० रुग्णांसाठी कोविड केअर सेंटर सध्या सुरू आहेत. बुधवारी दुपारपर्यंत १८७ रुग्ण येथे दाखल होते. येथे ३४ कर्मचाऱ्यांची मंजुरी आहे; मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांची केवळ तीन पदे भरण्यात आली. इतर चार पदे रिक्त आहेत. त्यामुळे वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. इतर सुविधा वेळेवर मिळतात मात्र रुग्णसंख्या क्षमतेपेक्षा जास्त झाल्याने जमिनीवर गादी टाकण्याची पाळी येत आहे, तर कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात मंजूर झालेल्या १०० खाटांच्या कोविड केअर सेंटरसाठी कर्मचारी व वैद्यकीय अधिकारी कसे उपलब्ध करावेत हा मोठा प्रश्न आरोग्य विभागासमोर आहे. येथील वैद्यकीय अधीक्षक डाॅ. चेतन आदमाने वगळता एकही स्पेशालिस्ट वैद्यकीय अधिकारी नसल्याने येथील व्यवस्था सांभाळताना व नियोजन करताना त्यांची चांगलीच दमछाक होत आहे.
===Photopath===
210421\img_20210410_180709_14.jpg