शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

'संतोष देशमुख प्रकरणाचा तपास होईपर्यंत मुंडेंना सत्तेतून बाहेर ठेवा'; प्रकाश सोळंकेंची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2024 15:28 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन १९ दिवस उलटले, पण अजूनही पोलिसांनी आरोपींना अटक केलेली नाही. दरम्यान, आज बीड मध्ये सर्वपक्षीय आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चामध्ये सर्व पक्षातील आमदारांची उपस्थिती होती. या मोर्चात वाल्मिक कराड यांना अटक करण्याची मागणी झाली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनीही मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली. गेली चार वर्षे बीड जिल्ह्याचे पालकमंत्रिपद मुंडे यांनी भाड्याने दिले होते अशी टीका केली. 

'आधी आईवर अत्याचार करायचे, तिच्या मृत्यनंतर माझ्यावर करताहेत'; अल्पवयीन मुलीने पोलिसांना सांगितली आपबीती

आक्रोश मोर्चात बोलताना आमदार  प्रकाश सोळंके म्हणाले, संतोष देशमुख यांची हत्या होऊन १९ दिवस झाले पण अजूनही काही आरोपींना अटक झालेली नाही. काही आरोपी मोकाटच आहेत. खंडणीतील मुख्य आरोपी वाल्मिक कराड यांनाही अटक झालेली नाही. गेली चार वर्षे धनंजय मुंडे पालकमंत्री होते. पंकजा मुंडे म्हणाल्या होत्या, धनंजय मुंडे यांनी पालकमंत्री भाड्याने दिले. कोणाला दिले तर वाल्मिक कराड यांना दिले, असा आरोप आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. 

"पालकमंत्र्यांचे त्यांना अधिकार मिळाल्यानंतर त्यांनी पोलिस प्रशासन आणि प्रशासनावर जरब बसवली. फोन करुन पोलिस ठाण्यात कुणालाही अडकवायला सांगायचं. हजारो लोकांवर गुन्हे दाखल केले. परळी तालुक्यात गोदावरी नदीतून दररोज ३०० हायवा वाळूचा उपसा करतात. या हायवा कोणाच्या आहेत? या सर्व गोष्टीला ज्यांनी वाल्मिक कराड यांच्या पाठिमागे शक्ती उभी केली ते धनंजय मुंडे जर सरकारमध्ये असल्यास या केसमध्ये कोणालाही न्यायाची अपेक्षा नाही म्हणून या निमित्ताने मी मुख्यमंत्री आणि अजितदादांना विनंती करतो की या केसचा तपास होईपर्यंत त्यांचं मंत्रिपद काढून घेण्यात यावं, अशी मागणीही सोळंके यांनी केली. आजचा मोर्चा हे आमचं पहिलं पाऊल आहे. जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर या पेक्षा मोठं आंदोलन कराव लागणार आहे, असंही सोळंके म्हणाले. 

टॅग्स :beed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीडPrakash Solankeप्रकाश सोळंके