शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

तपोरत्नं माजलगावकर महाराजांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 18:46 IST

 'ॐ नमः शिवाय'च्या गजरात झाला समाधीविधी

ठळक मुद्देहजारो शिवभक्तांचे डोळे पाणावले

माजलगाव : येथील सद्गुरू श्री मिस्कीन स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती श्री तपोरत्नं प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांना शनिवार  रोजी साश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. यावेळी हजारो शिवभक्तांचे डोळे पाणावले. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास हिमवत्केदार महापीठाचे जगद्गुरू श्री श्री श्री १००८ भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मार्गदर्शनाखाली समाधीविधी पार पडला. हजारो शिवभक्तांनी 'ॐ नमः शिवाय'च्या गजरात तपोरत्नं माजलगावकर महाराजांना साश्रू नयनांनी निरोप दिला.

 शुक्रवारी तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराजांचे निर्वाण झाल्यानंतर जिल्ह्यासह महाराष्ट्र आणि राज्याबाहेरील भक्तांची अंत्यदर्शनासाठी रिघ लागली होती. यावेळी श्री श्री श्री १००८ रावळसिध्दी विभूषित हिमवत्केदार वैराग्य सिंहासनाधिश्वर, जगद्गुरू भिमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी, वेदांताचार्य सिध्दलिंग शिवाचार्य महाराज साखरखेर्डेकर, श्रीगुरू शंकरलिंग शिवाचार्य महाराज अंबाजोगाईकर, श्रीगुरू नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज पूर्णेकर, श्रीगुरू पंचाक्षरी शिवाचार्य महाराज माळकवठेकर, पाथरीच्या कांचबसवेश्वर मठाचे श्रीगुरू काशीनाथ शिवाचार्य महाराज, श्रीगुरू सिध्दलिंग शिवाचार्य महाराज शिखर शिंगणापूरकर, श्रीगुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मुखेडकर, श्रीगुरू विरूपाक्ष शिवाचार्य महाराज मानूरकर, श्रीगुरू महादेव शिवाचार्य महाराज कळमनुरीकर, श्रीगुरू बादेश्वर शिवाचार्य महाराज गिरगावकर,श्रीगुरू  महन्तमा स्वामी महाराज थोरवेकर, वेदांताचार्य सद्गुरू दिगंबर शिवाचार्य महाराज थोरवे मठ वसमतकर, श्रीगुरू सुर्यकांतेश्वर शिवाचार्य महाराज, श्रीगुरू चन्नबसव शिवाचार्य गुरू महालिंग शिवाचार्य बर्दापूरकर यांच्यासह ३० पेक्षा शिवाचार्य महाराज यांची उपस्थिती होती. 

हेही वाचा - गुरूंच्या विरहाने शिष्याने सोडले प्राण; समाधीस्थळीच घेतला अखेरचा श्वास

तसेच कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा या राज्यातील हजारो भक्तगणांनी अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली. शिवाचार्य महाराज तपोरत्नं प्रभुपंडिताराध्य शिवाचार्य माजलगावकर महाराज यांच्या समाधीविधीस उपस्थित होते. आमदार प्रकाश सोळंके, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक डक, शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे, आमदार राधाकृष्ण होके पाटील, मोहनराव सोळंके, रमेशराव आडसकर, अप्पासाहेब जाधव, अशोक होके पाटील, ज्ञानेश्वर मेंडके, अरूण राऊत, अॅड.सुरेश दळवे आदींसह विविध पक्षांचे नेते कार्यकर्त्यांनी तपोरत्नं महाराजांच्या पार्थिव देहाचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी हजारांवर भक्तगणांनी  शेवटचे दर्शन घ्यायला लावली.

हेही वाचा - वीरशैवांचा आधारवड कोसळला; माजलगावकर महाराज शिवचरणी लीन

टॅग्स :BeedबीडDeathमृत्यू