शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

श्री क्षेत्र भगवानगडावर भक्तांची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2019 23:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या ५४ व्या पुण्यतिथीसाठी सोमवारी राज्यभरातून भगवान भक्तांची मांदियाळी गडावर ...

ठळक मुद्देलाखो मस्तक भगवानबाबांच्या चरणी झुकले : रुबाबदार अश्व, बाबांच्या पादुकांसह प्रतिमेची प्रदक्षिणा

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : ऐश्वर्यसंपन्न संत भगवान बाबांच्या ५४ व्या पुण्यतिथीसाठी सोमवारी राज्यभरातून भगवान भक्तांची मांदियाळी गडावर दाखल झाली होती. लाखो मस्तक बाबांच्या समाधीवर नतमस्तक झाले तर सकाळपासूनच गडाचे रस्ते भाविकांनी फुलून गेले होते. दर्शनासाठी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सकाळी महंत डॉ. नामदेव शास्त्री यांच्या हस्ते समाधीचा महाभिषेक केला गेला. तर गडाचा रुबाबदार अश्व, बाबांच्या पादुकासह प्रतिमेची प्रदक्षिणा व कीर्तनानंतर उपस्थित सर्व भाविकांना महाप्रसाद वाटप करण्याचे काम भगवान विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले.बाबा त्या काळी घोड्याच्या टांग्यात प्रवास करायचे तो टांगा आज संभाळून ठेवला. त्याचे कारण सांगताना या टांग्याने संपूर्ण महाराष्ट्र जागा केल्याचे सांगितले. आईचा मोठेपणा लहान मुलाला कळत नाही तसेच संताचा मोठेपणा कळत नसल्याचे सांगितले. संतांना जवळच्यांनीच त्रास दिला तीच परंपरा आजही चालू आहे. पण संत त्या त्रासाला समोर हसत खेळत सामोरे जातात म्हणूनच ते गेल्यानंतर आपण त्यांचे स्मरण ठेवतो आणि त्यांच्यावरच्या श्रध्देनेच कल्याण होते हा विश्वास डॉ. नामदेव शास्त्री यांनी व्यक्त केला.या वेळी आचार्य नारायण स्वामी, सिध्देश्वर संस्थानचे महंत स्वामी विवेकानंद शास्त्री, भगवान महाराज रजपूत (वडवणी), राधाताई महाराज (पाटोदा), रामगिरी महाराज (येळी) बाबासाहेब महाराज बडे आदींची उपस्थिती व लाखोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते.पुढील पुण्यतिथीसाठी अनेकांनी आपले योगदान जाहीर केले. गादीघर ते समाधीस्थळ आकर्षक रांगोळीने सजवले गेले होते. बाबांच्या दर्शनानंतर भाविक कृतार्थ झाले होते.नामदेव शास्त्री : दुसऱ्याची निंदा करू नकाकीर्तनप्रसंगी ‘संताचा महिमा तो बहु दुर्गम । शाब्दिकाचे काम नाही येथे ।।’ या अभंगावर बोलताना डॉ. नामदेव शास्त्री यांनी संतांचा महिमा सांगितला.आपला मेंदू दुसºयाची निंदा करण्यासाठी व्यर्थ घालू नका. ज्ञानेश्वरांनी वाळवंटात कीर्तन करुन जातीपातीच्या शृंखला तोडल्या. तेच काम संत भगवान बाबांनी केले. संपूर्ण आयुष्य ज्ञानेश्वरीसाठी जगले त्यांचे नाव भगवानबाबा. म्हणूनच गडावर ज्ञानेश्वरीचे अध्ययन सुरु आहे. चाळीस मुलांनी संपूर्ण ज्ञानेश्वरी मुखोद्गत केली हे भगवान बाबांचे वैभव आहे, असे असे डॉ. नामदेवशास्त्री म्हणाले.

टॅग्स :BeedबीडReligious programmeधार्मिक कार्यक्रम