शहरं
Join us  
Trending Stories
1
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
2
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
3
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
4
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
5
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
6
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
7
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
8
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
9
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
10
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
11
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
12
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
13
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
14
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
15
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
16
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
17
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
18
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...
19
नाशिक: बहिणीला प्रपोज केल्याच्या संशय, रस्त्यात गाठून इतकं मारलं की, तरुणाचा जीवच गेला
20
'ऑपरेशन सिंदूर'नंतर दिवस फिरले, आधीच कर्जात असलेल्या पाकिस्तानने मोठी कंपनी काढली विकायला!

३० गावांमध्ये रोज १०० झाडे लावून जगविण्याचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:21 IST

बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे ...

बीड : कोरोनाकाळात ऑक्सिजनची किंमत प्रत्येकाला जाणवली आहे. तसेच मागील काळात वृक्षतोडीचे प्रमाण वाढल्यामुळे वृक्षलागवड करून त्यांचे संवर्धन करणे गरजेचे आहे. यासाठी नेकनूर परिसरातील काही प्रशासकीय अधिकारी व तरुणांनी मिळून बीजांकुर नावाची मोहीम सुरू केली आहे. या माध्यमातून रोज १०० झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जात आहे. तसेच झाडे जगविण्यासाठी गावातील नागरिकांवर जबाबदारी दिली जात आहे. वृक्षसंवर्धनाच्यासंदर्भात जनजागृती केल्यामुळे ग्रामस्थांचाही या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

मागीलवर्षी नेकनूर पोलीस ठाण्याचे प्रमुख सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्‍मण केंद्रे यांच्यासह अशोक शिंदे, मनोज गव्हाणे, सुरेश रोकडे, रामनाथ घोडके, अमोल नवले यांच्यासह ‘मॉर्निंग टी’ आणि बीजांकुर ग्रुपनेे नेकनूरसह परिसरात बीजारोपण व वृक्षारोपण करीत झाडांचे महत्त्व अधोरेखित केले होते. या मोहिमेची आता चळवळ होण्यासाठी जनजागृती सुरू आहे. याचा प्रारंभ तालुक्यातील कळसंबर येथून झाला. ग्रामस्थांनी वड, पिंपळ, लिंबाचे वृक्षारोपण करून ते जतन करण्याचा संकल्प केला आहे.

गेल्यावर्षी डोंगरमाथ्यावर ७५ हजार बीजरोपणासह नेकनूर बाजारतळ, चाकरवाडी, मांडवखेल, भंडारवाडी येथे हजारो झाडांची लागवड केली होती. ती झाडे आता मोठी झाली आहेत. यावर्षी मात्र नेकनूर पोलीस ठाणेअंतर्गत असलेल्या ३० गावांमध्ये १५ जुलै ते १५ ऑगस्ट या एका महिन्याच्या कालावधीत रोज १०० याप्रमाणे ३००० झाडे लावून ती ग्रामस्थांच्या सहकार्याने जोपासण्याचे काम हाती घेत ‘हरित गाव’ या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे.

रोपांचा केला जातो पुरवठा

गावांमध्ये वृक्षारोपण करायचे असल्यास बीजांकुर ग्रुपच्यावतीने त्या गावांमध्ये रोपांचा पुरवठा केला जातो. तसेच ग्रुपमधील सदस्य त्या गावांमध्ये जाऊन ग्रामस्थांसोबत वृक्षारोपण करतात. तसेच ग्रामस्थांमध्ये वृक्षसंवर्धनाची गरज याविषयी जनजागृती केली जाते.

नागरिकांनी मोठ्या प्रमाणत सहभागी व्हावे

बालाघाट परिसरातील डोंगर बोडखे झालेले आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. दरम्यान, ग्रामीण भागातही वृक्षलागवड करणे गरजेचे असून, ‘हरित गाव’ या उपक्रमात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन वृक्षलागवड करावी, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण केंद्रे यांनी केले आहे.

200721\2959565620_2_bed_8_20072021_14.jpg~200721\3000565920_2_bed_7_20072021_14.jpeg

ग्रमस्थांच्या मागणीनुसार रोपांचा पुरवठा केला जातो.~डोंगर रांगावर वृक्षारोपण करताताना  सपोनि लक्ष्मण केंद्रे, अशोक शिंदे, गोरख वाघमारे, रामनाथ घोडके, मनोज गव्हाणे, सुरेश रोखडे, अमोल नवले यांच्यासह बिजांकूर गृपचे सदस्य व ग्रामस्थ दिसत आहेत.