शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

पाटोद्यात नव्वदीतल्या आजींचा निवडणूक लढविण्याचा निर्धार; ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भरला उमेदवारी अर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2017 15:41 IST

पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील नव्वदीतल्या आजीने निवडणूक लढण्याचा निर्धार करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.

ठळक मुद्देपाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील नव्वदीतल्या आजीने निवडणूक लढण्याचा निर्धार करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणूक लढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करत त्या आजींनी आज उमेदवार म्हणून नामनिर्देशनसुद्धा दाखल केलं आहे . 

- विलास भोसले पाटोदा: मराठवाड्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं आहे. म्हणूने तिथे सध्या वातावरणात गारवा आहे. विशेष म्हणजे तिथे सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचा  फिवर पाहायला मिळतो आहे. पाटोदा तालुक्यातील कारेगाव येथील नव्वदीतल्या आजीने निवडणूक लढण्याचा निर्धार करत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. निवडणूक लढण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण करत त्या आजींनी आज उमेदवार म्हणून नामनिर्देशनसुद्धा दाखल केलं आहे . 

तालुक्यात कारेगाव राजकीय दृष्टया संवेदनशील गाव समजलं जातं . गावात बहुतांश अल्पसंख्यांक समाजाचा मतदार आहे . तसंच नव्वद टक्के मतदार अल्पसंख्य आहेत . या वर्षीच्या ग्राम पंचायत निवडणुकीत गावातील प्रभाग क्र. 1 हा मागासवर्गीय महिलांसाठी राखीव आहे. हीच संधी साधत शांताबाई दशरथ शेलार या 89 वर्ष वयाच्या आजीने उमेदवारी दाखल केली आहे. गावाचा विकास करण्याचा आपला संकल्प असून मी निवडून येणार अशा आत्मविश्वासपूर्ण  भावना त्यांनी यावेळी व्यक्त केल्या.

निवडणुकीची तयारी पूर्ण  निवडणुकीत उभा राहण्यास काय आवश्यक आहे हे जाणत. शांताबाई यांनी जात प्रमाणपत्रही मिळवले आहे.  त्यानंतर ऑनलाईन अर्ज भरत त्याची हार्डकॉपी त्यांनी तहसील कार्यालयात जमा केली आहे. यावेळी अतिशय तंदुरुस्त आणी काठी व आधाराशिवाय त्यां तहसीलमध्ये वावरताना दिसत होत्या.