शहरं
Join us  
Trending Stories
1
मल्लिकार्जुन खर्गे यांच्या RSS वर बंदी घालण्याच्या मागणीवर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले
2
एक काेटी वाहनांना नाही ‘हाय सिक्युरिटी नंबरप्लेट’! एकूण ६८.२४ लाख चालकांनी दिला प्रतिसाद
3
इस रात की सुबह नही ! मुंबईतील 'ओलीस नाट्य' म्हणजे आभासी वेडेपणाचे भेसूर प्रतिबिंब
4
कसली थंडी..? आता अनुभवा ‘नोव्हेंबर हीट’! मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाचीही शक्यता
5
दुलारचंद यादव हत्याकांड: नाट्यमय घडामोडींनंतर अनंत सिंह यांना अटक, रात्री पोहोचले पोलीस, त्यानंतर...
6
आजचे राशीभविष्य, ०२ नोव्हेंबर २०२५: हाती पैसा, यश-कीर्ती लाभेल; पण हट्टीपणा सोडावा
7
महिला वर्ल्डकप: आज घडणार इतिहास; प्रथमच जिंकेल भारत किंवा दक्षिण आफ्रिका; उत्सुकता शिगेला
8
कुष्ठरोगाचे निदान झाले रे झाले की, रुग्णनाेंद बंधनकारक; सार्वजनिक आरोग्य विभागाचा निर्णय
9
आयोगाचा सर्व्हर कुणाच्या कार्यालयात? कुणाची नावे काढायची, कुठली टाकायची हा कट सुरू: ठाकरे
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभच लाभ, पद-पैसा वाढ; ६ राशींना काहीसा ताप, तुमची रास कोणती?
11
चार हजार ग्राहकांनी वाढवली २२ मेगावॅट क्षमता; २ हजार ४६० औद्योगिक ग्राहकांचाही समावेश
12
मूक आंदोलन करून भाजपने केला पलटवार! ...हा तर मविआचा नवा कट- रवींद्र चव्हाण
13
जय हरी विठ्ठल.. एकनाथ शिंदे यांनी सपत्नीक केली विठ्ठल-रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
14
दुबार मतदार दिसताच बडवा; मविआ-मनसेचा महाएल्गार! मतदार यादीतील घोळाबाबत मुंबईत निषेध मोर्चा
15
गाव पोटा.. व्यवसाय शेती अन् वालेगावकर दाम्पत्याला मिळाला उपमुख्यमंत्र्यांसोबत महापूजेचा मान
16
‘तुमच्या विमानात आज १९८४ मद्रास स्टाईल बॉम्ब अटॅक होणार आहे’; मुंबईत इमर्जन्सी लँडिंग
17
२४ मोबाईल खेचणाऱ्या दोन आरोपींना अटक; आचोळेच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पोलिसांची कामगिरी
18
ठेकेदारांचे कामबंद, हिवाळी अधिवेशन नागपूर की मुंबईत? बांधकाम खाते संभ्रमात
19
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
20
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही नीट परीक्षेत यश; संतोष देशमुखांची मुलगी वैभवी होणार डॉक्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2025 15:54 IST

पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे.

केज (जि. बीड) : तालुक्यातील मस्साजोग येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने १२वी विज्ञानच्या यशानंतर नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. आता ती वडिलांचे डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण करणार आहे. तिच्या शिक्षणाची जबाबदारी अनेक राजकीय नेत्यांनी घेतलेली आहे.

संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. देशमुख कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असताना आणि पित्याचे छत्र हरपल्यानंतरही वैभवीने खचून न जाता १२ वी विज्ञान परीक्षेत ८५.३३ टक्के मिळविले होते. या यशानंतर तिने नीट परीक्षेतही यश संपादन केले आहे. तिच्या दृष्टीने हे यशही अतुलनीय असून तिचे आणि तिच्या वडिलांचे डॉक्टर होण्याचे प्रयत्न होणार आहेत. खासगी महाविद्यालयात तिला एमबीबीएसला प्रवेश घेऊन डॉक्टर होण्याचे तिचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण जिवाचे रान करणार असल्याची माहिती वैष्णवीचे चुलते धनंजय देशमुख यांनी दिली. वैभवीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून जिद्द, चिकाटी आणि परिश्रमाच्या जोरावर हे यश संपादन केल्याने तिचे कौतुक होत आहे.

विराज, सत्यजितचा सांगलीत प्रवेशसंतोष देशमुख यांची मुलगी वैभवी व मुलगा विराज यांच्या शिक्षणाची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, उदय सामंत, खासदार सुप्रिया सुळे, संभाजीराजे आदींनी घेतलेली आहे. तसेच शुक्रवारी धनंजय देशमुख यांचा मुलगा सत्यजित व विराज यांचा प्रवेश रेठरेधरण (जि.सांगली) येथील सैनिकी विद्यालयात प्रवेश निश्चित केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवादही साधला होता.

मुलीला डॉक्टर करण्याचे स्वप्नआपली मुलगी वैभवी ही डॉक्टर व्हावी, यासाठी संतोष देशमुख यांनी तिला लातूरमध्ये शिक्षणासाठी ठेवले होते. अधून-मधून ते तिला भेटायला जात असत. अखेर संतोष देशमुख यांचे स्वप्न आता सत्यात उतरणार आहे. आता तिला कोणत्या वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणBeedबीडNEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल