शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

मूल अदलाबदल प्रकरणातील दोषींना उपसंचालकांचे अभय

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 19:22 IST

राज्यभर गाजलेल्या जिल्हा रुग्णालयातील मूल अदलाबदल प्रकरणात दोषी परिचारिकांवर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही.

बीड : राज्यभर गाजलेल्या जिल्हा रुग्णालयातील मूल अदलाबदल प्रकरणात दोषी परिचारिकांवर अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. जिल्हा रूग्णालय प्रशासनाने कारवाईचा प्रस्ताव पाठविल्यानंतरही लातूरच्या आरोग्य उपसंचालकांकडून या प्रकरणाकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात आहे. त्यांच्याकडूून या कर्मचाऱ्यांना अभय दिले जात असल्याची चर्चा सध्या बीडमध्ये सुरू आहे.११ मे रोजी छाया राजू थिटे (रा. हिंगोली ह. मु. कुप्पा, ता. वडवणी) या महिलेने मुलीला जन्म दिला होता. परंतु रुग्णालयातील शुभांगी नाईकवाडे, सपना राठोड, संगीता बनकर, सुनीता पवार या चार परिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे मुलीऐवजी मुलाची नोंद झाली. हा सर्व प्रकार २१ मे रोजी समोर आला. त्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सतीश हरीदास यांना चौकशीचे आदेश दिले. त्यांनी सर्वांचे जबाब घेतले. डॉ.थोरात यांनी यापूर्वीच डॉ. परमेश्वर बडे, डॉ. अनिल खुलताबादकर यांना कार्यमुक्त केले होते. व परिचारीकांवर कारवाईसाठी आरोग्य उपसंचालकांकडे प्रस्ताव पाठविला होता.दरम्यान, प्रस्ताव पाठवून दीड महिना उलटला तरी अद्याप यावर कसलीच कारवाई झालेली नाही. आरोग्य उपसंचालक डॉ. हेमंत बोरसे यांना संपर्क केल्यानंतर कारवाई प्रस्तावित आहे, असे सांगून या प्रकरणाला बगल दिली जात आहे. त्यामुळे आता या प्रकरणात आरोग्य उपसंचालकांकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप सर्वसामान्यांमधून होत आहे.अधिवेशनात प्रश्न उपस्थितमूल अदलाबदल प्रकरणाचा प्रश्न अधिवेशनातही तारांकीत करण्यात आल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते. यावर बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकांकडून माहिती सुद्धा मागविली होती. त्यांनी यामध्ये नेमकी काय माहिती दिली, हे मात्र समजू शकले नाही.कारवाई टाळाटाळसूत्रांच्या माहितीनुसार डॉ. बोरसे यांना जिल्हा रुग्णालयातील वरिष्ठ अधिकारी या प्रकरणात भेटले आहेत. कारवाईची विचारपूसही केल्याचे सांगण्यात आले. परंतु बोरसे यांच्याकडून अद्याप कसलीच कारवाई झालेली नाही. या सर्व परिस्थितीवरून या प्रकरणातील दोषींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे दिसून येते. आमच्या हातातील कारवाई पूर्ण केली आहे. परिचारिकांवरील कारवाईसाठी वरिष्ठांकडे प्रस्ताव पाठविलेला आहे. तेच पुढील कारवाई करतील. कारवाईसंदर्भात बोललो देखील आहे. लवकरच निर्णय येईल.डॉ.अशोक थोरातजिल्हा शल्यचिकित्सक, बीड---------------कारवाईसाठी प्रस्ताव आला आहे. त्यावर टिप्पणी ठेवली आहे. कारवाई व्हायला हरकत नाही. होईल कारवाई लवकरच.डॉ.हेमंत बोरसेआरोग्य उपसंचालक, लातूर

टॅग्स :Beedबीड