शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वैद्यकीय प्रमाणपत्राअभावी खचतेय ‘मनोधैर्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:19 IST

शिरूर कासार तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे त्रांगडे झाले आहे.

ठळक मुद्देतीन महिन्यानंतरही दोषारोपपत्र नाही

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : तालुक्यातील बारगजवाडी येथे एका अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी शिरुर कासार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होऊन तीन महिने झाले तरी अद्याप दोषारोपपत्र दाखल न झाल्याने मनोधैर्य योजनेचा प्रस्ताव दाखल करण्यास विलंब होत आहे. केवळ वैद्यकीय प्रमाणपत्र मिळत नसल्याने हे त्रांगडे झाले आहे.

बलात्कार व बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा देखील दाखल झाल्यानंतर पीडित कुटुंबियांनी संस्थेची मदत मागितल्याने ग्रामीण विकास केंद्रसंस्थेचे अध्यक्ष समीर पठाण यांनी या प्रकरणी शिरूर पोलिसांनी काय कारवाई केली ? या बाबत ९ नोव्हेंबर रोजी माहितीस्तव अहवाल मागितला होता. त्या नुसार शिरूर कासार पोलिसांनी दिलेल्या अहवालात पीडित मुलीच्या आईने दिलेल्या जबाबावरुन गुन्हा दाखल केल्याचे म्हटले आहे.

पीडित मुलीला तिच्या आई वडिलांनी ३० जुलै रोजी पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. तेथील डॉक्टरांनी तिला अहमदनगर येथील शासकीय जिल्हा रुग्णालयात रेफर केले. त्यानुसार तेथे अत्याचारा बाबतच्या सर्व तपासण्या व उपचार करण्यात आले आहेत.

परंतु, तेथील वैद्यकीय प्रमाणपत्र पाथर्डी उपजिल्हा रुग्णालय आणि नगरच्या जिल्हा रुग्णालयाकडून मिळत नसल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाथर्डी व अहमदनगर जिल्हा रुग्णालयाकडून प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत आहे.

जिल्हाधिका-यांकडे अहवाल सादरसमीर पठाण यांनी दखल घेत २४ नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील निवासी जिल्हाधिका-यांना भेटून सदर पीडित मुलगी ही अल्पवयीन आहे. तिची कौटुंबिक परिस्थिती गरीबीची आहे. पीडितेवर अगोदरच मोठा आघात व अत्याचार झालेला असून, अहमदनगर आरोग्य विभागाकडून तिच्या वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याबाबत टाळाटाळ होत आहे. पीडित मुलीचे वैद्यकीय प्रमाणपत्र तात्काळ देण्याची तसेच अहमदनगर आरोग्य विभागातील कामचुकार अधिका-यांवर कारवाईची मागणी समीर पठाण यांनी केली आहे. या संदर्भात बीड व अहमदनगर येथील जिल्हाधिका-यांनाही समीर पठाण यांनी अहवाल सादर केला आहे.