१५ जूनपासून आशा व गटप्रवर्तक यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी राज्यव्यापी संप पुकारलेला होता.
शासनाने त्याची कोणतीच दखल घेतली नाही म्हणून संघटनेच्यावतीने मंगळवारी आंदोलन करण्यात आले. आरोग्य मंत्र्यांबरोबर झालेल्या बैठका निष्फळ ठरल्या, कारण मंत्र्यांनी आश्वासन देण्याशिवाय काहीच केले नाही. संघटना चर्चेस तयार असूनही शासन कोणतीच दखल घेत नाही, तसेच आशांच्या बाबतीत घेतलेल्या निर्णयाची ही अंमलबजावणी होत नाही, असे संघटनेच्या निवेदनात म्हटले. आशांना दरमहा १८ हजार मानधन द्या, कोविड काळातील कामासाठी तीनशे रुपये प्रतिदिन भत्ता द्या, क्षयरोग, कुष्ठरोग सर्व्हेचे पैसे देण्यात यावे, सामाजिक सुरक्षा देण्यात यावी, आरोग्य खात्यात कायम कर्मचारी म्हणून घेण्यात यावे, अशा मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष शिवाजी कुरे, सय्यद याकुब, उर्मिला शेंडगे, उषा औसे, मीरा सुरवसे, सारिका नवले, सुनीता कदम, अर्चना पांचाळ, सुवर्णा खोडे, सुनीता चव्हाण यांच्यासह तालुक्यातील आशा सहभागी झाल्या होत्या.
===Photopath===
220621\purusttam karva_img-20210622-wa0003_14.jpg