सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा
पाटोदा : भंडारा येथील जिल्हा रुग्णालयात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत नवजात अर्भकांच्या झालेल्या मृत्यू प्रकरणात दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचे अर्थसहाय्य मंजूर करावे अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हा महासचिव सचिन मेघडंबर यांनी केली आहे.
जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन
माजलगाव : राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त जिव्हाळा प्रतिष्ठानतर्फे १२ जानेवारी रोजी सकाळी ९ वा. रक्तदान शिबिराचे आयोजन डाके हॉस्पिटल, बीड रोड येथे केले आहे. तहसीलदार वैशाली पाटील, गटविकास अधिकारी प्रज्ञा माने भोसले, मुख्याधिकारी विशाल भोसले, महावितरणचे उप कार्यकारी अभियंता सुहास मिसाळ, सहायक अभियंता चेतन चौधरी यांची उपस्थिती राहणार आहे. दात्यांनी रक्तदान करावे असे आवाहन प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. अजय डाके यांनी केले आहे.
पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम
बीड : गुरव समाजाचे संत काशिबा महाराज गुरव यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी नगरसेवक अमर नाईकवाडे, जिल्हाध्यक्ष राजेश गवळी, राष्ट्रीय उपाध्यक्ष गणेश पुजारी, रंगनाथ मोकाशी, राजाभाऊ गवळी, शिवाजी गवळी, रोहित गवळी, बाळासाहेब वाघमारे, विश्वंभर शिंदे, फडणीस शीलाताई, श्रीराम पुजारी, राजकुमार वाघमारे, किरण गवळी, संजय गुरव, गोपाळराव पुजारी, बाळासाहेब वाघमारे, दत्ता नीळकंठ, सिद्धेश्वर मोकाशी, वैजनाथ फुलझळके आदी समाजबांधव उपस्थित होते.
वाहतुकीला अडथळा
पाटोदा : शहरातील विविध बँकांसह सार्वजनिक ठिकाणी दुचाकींची अस्ताव्यस्त पार्किंग होत असल्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. याकडे पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून वाहनकोंडी होत आहे. काहीवेळा वादाचेही प्रसंग उद्भवत आहेत. त्यामुळे कारवाया करण्याची मागणी होत आहे.
पदोन्नतीने बदली
बीड : अंबाजोगाई येथील उपविभागीय कार्यालयातील अव्वल कारकून जी. एस. जिडगे यांची हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयात नायब तहसीलदार पदावर पदोन्नती झाली आहे. याबद्दल सामाजिक कार्यकर्ते शेख सिराज यांनी त्यांचा सत्कार केला. नायब तहसीलदार एस.एस. बाहेती, कर्मचारी उपस्थित होते.