शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

रंगीबेरंगी ' आरोही ' टरबूजांना विदेशातून मागणी; अंबाजोगाईच्या तरुण शेतकऱ्याने ३० गुंठयातून घेतले लाखोचे उत्पन्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2021 18:17 IST

देवळा येथील रंगीत टरबुजाला विदेशात मागणी

ठळक मुद्देयुवक शेतकरी रविंद्र देवरवाडे यांच्या परिश्रमाला यशवरून हिरवे तर आतुन पिवळे असणारे "आरोही" टरबूजकेवळ ३० गुंठे जमिनीत दिड लक्ष रुपयांचे उत्पादन

- अविनाश मुडेगांवकरअंबाजोगाई-: वरून हिरवे तर आतून पिवळे असणारे रंगीत टरबूज "आरोही"चे देवळा(ता.अंबाजोगाई)त उत्पादन झाले आहे.या रंगीत टरबुजाला परदेशातुन  मागणी होत आहे. ही किमया युवक शेतकरी रविंद्र देवरवाडे यांनी साध्य केली आहे. या प्रयोगातून त्यांनी दोन महिन्यात केवळ ३० गुंठे जमिनीत दीड लक्ष रुपयांचे उत्पादन घेतले आहे.

जे विकेल ते पिकेल या धर्तीवर शेतीत नवीन उत्पादन घेतले तर निश्चितच त्याचा फायदा होतो. देवळा येथील  स्मार्ट शेतकरी, पदंमश्री डॉ आप्पासाहेब पवार अग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती,असे अनेक शेती आणि सामाजिक पुरस्कार प्राप्त  प्रयोगशील शेतकरी रविंद्र भानुदासराव देवरवाडे देवळा ता अंबाजोगाई येथील शेतकरी यांनी नोन यु सिड्स अरोही आणि विशाला अशा दोन प्रजातीच्या  रंगीत टरबूजाचे   उत्पादन  घेतले. हे टरबूज वरून हिरवे आणि आतून पिवळे आणि वरून पिवळे आणि आतून लाल अशा रंगाचे आहे. ३० गुंठे जमिनीत  पाच हजार रोपांची  लागवड २४ नोव्हेंबर रोजी करण्यात आली. पहिली  तोड हि २३ जानेवारीला झाली. अवघ्या दोन महिन्यात साधरण ४ किलो ते ५ किलो फळ झाले आहे. लागवड  हिवाळ्यातील  असून बदलत्या हवामाचा कसलाही फरक पडला नाही. आपल्या महाराष्ट्रात ही उत्तम रंगीत टरबूज येऊ शकते हे या प्रयोगातून शेतकरी  रविंद्र देवरवाडे  यांनी योग्य नियोजनातून  सिद्ध केले. 

अशा प्रयोगामुळे शेतकऱ्यांना नवं नवीन वाण  बाजारपेठेत  मागणी असणारे व  उत्तम नफा   मिळणून देणारे  पीक आहे. रिलायन्स मॉल मुबंई यांनी जागेवर येऊन या टरबुजाची खरेदी केली आहे.  हे टरबूज तैवान देशात लोकप्रिय असून याला मोठ्या  शहरातही  मागणी आहे.देवरवाडे यांनी शेती आधुनिक व तंत्रज्ञानाची जोड देऊन केल्यास निश्चीत यश व मोबदला मिळतो.याची प्रचिती नव्या पिढी समोर ठेवली आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीBeedबीडagricultureशेती