ढगाळ वातावरणाचा आंब्यावरही परिणाम
माजलगाव : काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहे. थंडित पावसाचे वातावरण झाले आहे. याचा परिणाम पिकांवर तर होत आहे. त्याचबरोबर फळांचा राजा समजल्या जाणाऱ्या आंब्यावरही होत आहे. या वातावरणामुळे बहरात आलेला आंब्याचा मोहोर गळू लागला आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम होण्याची शक्यता दिसत असून, फळबागायतदार शेतकरी अडचणीत सापडला आहे.
वैद्यकीय प्रवेश पात्र गुणवंतांचा गौरव
केज : शहरातील स्वामी विवेकानंद विद्यामंदिरच्या वैद्यकीय शिक्षणास पात्र ठरलेल्या १४ गुणवंतांचा शनिवारी विद्यालयातर्फे गौरव करण्यात आला. यावेळी अंकुश इंगळे, डॉ. बालासाहेब अस्वले, भालचंद्र देव, डॉ. पांडुरंग तांदळे, प्रकाश कोकीळ, विलास जोशी, गणेश कोकीळ, मुख्याध्यापक बी. व्ही. गोपाळघरे उपस्थित होते. यावेळी रेश्मा देशमुख, रिचा देशमुख, भगवती सावंत, पूनम डोईफोडे, अक्षदा लामतुरे, साक्षी शिंदे, कोमल जाधव, आरती डोईफोडे, राजश्री मुंडे, स्नेहा चंदनशिव, ऋतुजा केदार, संकेत काळे, आदींचा सत्कार झाला.