बस मागे- पुढे होताना खडी उडून लागत आहे. यामुळे प्रवासी वैतागले असून जीव मुठीत घेऊन त्यांना चालावे लागत आहे. त्यामुळे तात्काळ डांबरीकरण करावे, अशी मागणी प्रवासी नागरिकांमधून केली जात आहे. परंतु, अद्यापही या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात येत असून, बसस्थानकामधील रस्त्यावर मोठ-मोठे खड्डे पडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत.
फूटपाथची कामे पूर्ण करा
धारूर : शहरात शिवाजी चौकामधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही बाजूने असलेल्या फूटपाथचे काम रखडले आहे. केज रोड व तेलगाव रोडवरील फुटपाथची कामे अर्धवट अवस्थेत आहेत. यामुळे नागरिकांना व रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. हे काम राज्यरस्ते विकास महामंडळाने तात्काळ पूर्ण करावे, अशी मागणी व्यापारीवर्गातून होत आहे.
नियमांची पायमल्ली
बीड: हॉटेल व्यावसायिकांच्या हितासाठी राष्ट्रीय महामार्गाच्या नियमांची सर्रास पायमल्ली होत आहे. धुळे - सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी मध्यभागी दुभाजक तोडले आहेत. त्यामुळे अपघातास निमंत्रण मिळत आहे. याप्रकरणी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी वाहनधारक, नागरिकांमधून होत आहे.