एकबुर्जी शिवारात मोठ्या प्रमाणात झाडांची संख्या आहे. तसेच हा भाग आडवळणी असल्याने तिकडे कोणाचेही लक्ष जात नाही. त्यामुळे या भागात दलालामार्फत झाडे विकत घेऊन त्यांची तोड यंत्राद्वारे करणे शक्य होत आहे. त्यामुळे या भागात प्रत्येक दिवशी झाडाची सौदेबाजी होत असते एका एका शेतकऱ्यांना गाठून ही झाडे विकत घेतली जातात. तसेच झाडाची तोडणी यंत्राच्या सहाय्याने केली जाते. त्यामुळे कोणाच्या कोणाला पत्ता लागत नाही. यामध्ये रस्त्यालगत असलेल्या झाडाचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. याकडे सा बां विभाग किंवा वनविभाग लक्ष देण्यास तयार नाही. त्यामुळे प्रत्येक दिवशी वृक्षतोड ठरलेली असून शिवार उजाड होत आहे. या भागात दिवसाला १० ते २० पेक्षा अधिक झाडे तोडली जात असून रात्रीच्या सुमारे वाहनाच्या माध्यमातून माजलगाव येथे घेऊन जाताना दिसतात. मात्र त्यांना कसल्याही प्रकारे विचारणा केली जात नाही व त्यांच्यावर कसलेही गुन्हा दाखल केलेला दिसत नाही. ताडपत्री गाडीवर झाकून माल या भागातून शहराकडे जात असल्याचे दिसून येत आहे. याकडे लक्ष न दिल्यास काही दिवसात या भागातील मोठ्या प्रमाणात झाडे नामशेष होण्याची शक्यता निर्माण झाली आहे
एकबुर्जी शिवार परिसरात वृक्षतोड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:24 IST