शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्सिजन कॉन्सुरेशन मशीनचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:34 IST

अंबाजोगाई : जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व बीड यांनी जनसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केला असून, आजच्या ...

अंबाजोगाई : जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पूर्व बीड यांनी जनसेवेचा नवा आदर्श प्रस्थापित केला असून, आजच्या परिस्थितीमध्ये सामान्य व गरजू लोकांना आयसीयू बेड मिळणे खूप कठीण झाले असताना व दवाखान्यांमधील असलेली ऑक्सिजन सिलिंडरची कमतरता लक्षात घेता ऑक्सिजन कॉन्सुरेशन मशीनची गरज असल्याने या लोकहितकारी लोक कल्याणकारी प्रकल्पासाठी पुढाकार घेऊन या मशीनचा लोकार्पण सोहळा ऑनलाइन पद्धतीने पार पडला.

या मशीनद्वारे हवेतून ऑक्सिजन तयार केला जातो, तसेच रुग्णाला तात्काळ ऑक्‍सिजन उपलब्ध होतो. कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त वाढल्याने बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई, परळी, माजलगाव, केज व धारूर या पाच तालुक्यांकरिता तात्काळ ५ मशीन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसांत आणखीन पाच मशीन उपलब्ध होणार आहेत. याचा उपयोग गंभीर रुग्णांना घरीच बसून ऑक्सिजन मिळेल अत्यंत महत्त्वाची महागडी पण हाताळण्यास सोपी मशीन सामान्य व गरजू रुग्णांना मिळावी यासाठी जनसेवेचा एक नवा आदर्श समोर ठेवत जनकल्याण समिती व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने या मशीचे लोकार्पण करण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजता लोकार्पण सोहळा ऑनलाइन पद्धतीने झाला. याप्रसंगी मा. जिल्हा संघचालक पूर्वचे उत्तम कांदे, प्रांत कार्यकर्ते बिपिन क्षीरसागर, अंबाजोगाईचे तालुका संघचालक दत्तप्रसाद रांदड, जनकल्याण समितीचे जिल्हा कार्यवाह प्रकाशराव जोशी, राष्ट्र संवर्धन मंडळाचे विजयराव वालवडकर, जिल्हा कार्यवाह पूर्वचे शंतनू हिरळकर, कोरोना आपत्ती सहयोग समिती पूर्वचे जिल्हा प्रमुख जयदीप विर्धे, तालुका कार्यवाह वशिष्ठ भोसले व अनेक स्वयंसेवक कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, या मशीनचा लाभ मिळावा यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने व समितीमार्फत गरजूंना याचा वापर करता येईल, त्यासाठी प्रकल्प संयोजक कौस्तुभ कोदरकर व निखिल डिडवाणी यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

===Photopath===

080521\img-20210506-wa0186_14.jpg