शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

बीड पोलिसांच्या बदल्यांचा निर्णय निकालाअधीन; तडकाफडकी बदल्यांसंदर्भात ‘मॅट’चा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 17:25 IST

बीडचे पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अनेक पोलिस अंमलदारांच्या प्रशासकीय व इतर कारणास्तव २१ मे २०२५ रोजी मुदतपूर्व, तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या.

छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्यातील पोलिस अंमलदारांच्या करण्यात आलेल्या मुदतपूर्व तडकाफडकी बदल्यांचा ‘निर्णय’ या बदल्यांना आव्हान देणाऱ्या मूळ अर्जांच्या निकालाच्या अधीन राहील, असा अंतरिम आदेश महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाच्या औरंगाबाद खंडपीठाचे उपाध्यक्ष न्या. व्ही.के. जाधव यांनी उन्हाळ्याच्या सुटी दरम्यानच्या सुनावणीत दिला. न्यायाधीकरणाने प्रतिवाद्यांना नोटीस बजावण्याचा आदेश दिला. या मूळ अर्जांवर १० जून २०२५ रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

काय आहे आदेश ?बीडचे पोलिस अधीक्षक यांच्या आदेशान्वये जिल्ह्यातील अनेक पोलिस अंमलदारांच्या प्रशासकीय व इतर कारणास्तव २१ मे २०२५ रोजी मुदतपूर्व, तडकाफडकी बदल्या करण्यात आल्या. बदली केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना दुसऱ्याच दिवशी २२ मे २०२५ रोजी पदावरून कार्यमुक्त करण्यात आले. त्यांना बदलीच्या ठिकाणी ७ दिवसांच्या आत हजर होण्याचे निर्देश देण्यात आले. जे पोलिस अंमलदार या कालावधीमध्ये हजर होणार नाहीत, त्यांचा ‘कसुरी अहवाल’ वरिष्ठांना सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले होते.

अर्जदारांच्या मुदतपूर्व बदल्यावरील आदेशास अंजन गडदे, सोमीनाथ जायभाये आणि बालकृष्ण जायभाये यांनी ॲड. अमोल चाळक यांच्यामार्फत आव्हान दिले आहे. त्यांनी मूळ अर्जात म्हटल्यानुसार अंजन गडदे यांची अवघ्या ९ महिने व १४ दिवसांच्या सेवेनंतर तर सोमीनाथ जायभाये यांची अवघ्या ३ वर्ष ९ महिन्यात आणि बालकृष्ण जायभाये यांची केवळ एक वर्षे ११ महिन्यांच्या सेवेनंतर बदली करण्यात आली.

कर्मचारी व शासनाचा युक्तिवाद५ वर्षांचा कालावधी पूर्ण न करताच कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणे हे कायदेशीर तरतुदींचे उल्लंघन आहे. प्रशासकीय कारणास्तव बदली करण्याबाबत अर्जदारांविरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी अथवा गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल अथवा प्रलंबित नाही. सदर बदली व कार्यमुक्ती आदेश महाराष्ट्र पोलिस अधिनियमाचे कलम २२-एन तसेच २३ एप्रिल २०१० व १ जुलै २०१५ चे शासन निर्णय व इतर तरतुदींचा भंग करणारे व जाचक स्वरूपाचे असून ते रद्द करण्याजोगे आहेत, असा युक्तिवाद कर्मचाऱ्यांतर्फे ॲड. चाळक यांनी केला. शासनाने प्रक्रियेचा अवलंब करून, पोलिस आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्याचे सादरकर्ता अधिकारी एस.एस. डांबे आणि व्ही.जी. पिंगळे यांनी निदर्शनास आणून दिले.

टॅग्स :BeedबीडTransferबदली