बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर युवकांची फौज संरक्षण क्षेत्राकडे वळत आहेत.
२०१० मध्ये अंमळनेर पोलीस ठाण्याची निर्मिती झाली. या पोलीस ठाणे अंतर्गत ५८ गावे येत असून ३४ पोलीस कर्मचारी भार पेलत आहेत. चार महिला कर्मचाऱ्यांची संख्या आहे. येथे एक एपीआय, एक पीएसआय आणि इतर कर्मचाऱ्यांची पदे आहेत.
या पोलीस ठाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे बीड-कल्याण महामार्गावरील पिंपळवंडी-अमळनेर याच्या मध्य ठिकाणी उंच माळावर रस्त्यालगत इमारतीमध्ये हे पोलीस ठाणे आहे. पोलीस ठाण्याचे प्रमुख श्यामकुमार डोंगरे यांच्या कुशल संकल्पनेतून ठाणे परिसरात सुंदर हिरवीगार वनराई बहरली आहे. पोलीस ठाण्यातील कर्मचारी, पत्रकार बांधव तसेच सामाजिक कार्यकर्त्यांचा वाढदिवस ठाण्याच्या परिसरात वृक्षलागवड करून करण्याची उत्कृष्ट परंपरा राबवली जाते. आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहण्यासाठी कर्मचाऱ्यांसाठी उत्कृष्ट व्यायामाची आधुनिक साधने, सुसज्ज वाहनतळ आणि नूतन वर्षात ठाण्याच्या इमारतीला सुंदर रंगरंगोटी करण्यात आली आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील आणि या परिसरातील लोकांना योग्य ते कायद्याचे मार्गदर्शन करून पोलीस अधीक्षक ए राजा, अतिरिक्त पोलीस अधीक्षक संतोष लांजेवर, उपविभागीय पोलीस अधिकारी लगारे, आदीसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अंमळनेर पोलीस ठाण्याचे सपोनि श्यामकुमार डोंगरे कर्तव्य बजावत आहेत.
कर्तव्यपूर्तीचे समाधान!
‘ठाण्यांतर्गत येणारा परिसर हा ग्रामीण आणि ऊसतोड कामगार यांचा अधिक आहे. बीड कल्याण महामार्गावरील हा रस्ता असल्याने अपघात आणि इतर अनेक घटनांवर सदैव लक्ष असतेच; वृक्षारोपण, व्यायामाची साधने, क्रीडांगण, वाहनतळ आदीसह इमारतीची रंगरंगोटी हा कर्तव्य पालनाचा भाग असून यातून समाधान मिळते!’
श्यामकुमार डोंगरे
सहायक पोलीस निरीक्षक,
अंमळनेर पोलीस ठाणे.