शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

झुंज अपयशी; विषारी द्रव्य प्राशन केलेल्या मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 16:58 IST

रिक्षाचालकाने काढली होती छेड 

ठळक मुद्दे नातेवाईकांचा पोलीस चौकीसमोर ठिय्यामुलानेही घेतले विष

बीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथै गावातीलच रिक्षा चालकाने छेड काढल्याने वैतागलेल्या मुलीने ३ एप्रिल रोजी विषारी द्रव्य प्राशन केले होते. मंगळवारी पहाटेच्या सुमारास तिचा उपचारादरम्यान जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागात मृत्यू झाला. मुलावर आगोदरच गुन्हा दाखल झाला होता. मात्र त्याच्या आई-वडिलांवरही गुन्हा नोंद करून त्यांना तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडला होता. पोलिसांनी कारवाई केल्यानंतर त्यांनी माघार घेतली. 

छाया संपत राठोड (१७ रा. अंथरवन पिंपरी ता.बीड) असे मयत मुलीचे नाव आहे. तर प्रताप भानुदास पवार (२५) असे आरोपीचे नाव आहे. छाया गावातीलच महाविद्यालयात ११ वीच्या वर्गात शिक्षण घेत होती. तिचे आई-वडिल उसतोड कामगार आहेत. १५ दिवसांपूर्वीच ते गावी परतले होते. मात्र मागील काही महिन्यांपासून प्रताप हा छायाचा पाठलाग करून छेड काढत होता. या त्रासाला छाया वैतागली होती. यातूनच तिने ३ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास राहत्या घरात विषारी द्रव प्राशन केले. हा प्रकार आई पाहिल्यानंतर तिला तात्काळ जिल्हा रूग्णालयात दाखल केले. येथे तिच्यावर अतिदक्षता विभागात उपचार करण्यात आले. मात्र तिचीही मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आणि मंगळवारी पहाटे तिने अखेरचा श्वास घेतला. 

दरम्यान, दोन दिवसांपूर्वीच छायाचे वडील संपत पवार यांच्या जबाबावरून प्रताप विरोधात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. छायाचा  मृत्यू झाल्यानंतर प्रतापच्या आई-वडिलांनी त्याला सहकार्य केले म्हणून त्यांच्यावरही गुन्हा दाखल करून सर्वांना अटक करावी, या मागणीसाठी नातेवाईकांनी पोलीस चौकीसमोर ठिय्या मांडला. सपोनि श्रीकांत उबाळे, पोउपनि श्रीराम काळे यांनी धाव घेत नातेवाईकांच्या मागणीप्रमाणे कारवाई करून आरोपींना अटक करण्याचे आश्वासन  दिले. त्यानंतर छायाचा मृतदेह त्यांीन ताब्यात घेत गावी अंत्यसंस्कारासाठी घेऊन गेले.  याप्रकरणाचा तपास पोउपनि श्रीराम काळे हे करीत आहेत.

मुलानेही घेतले विषघटनेच्या दिवशीच छायाने विषारी द्रव्य प्राशन केल्याचे समजताच प्रतापनेही विषारी द्रव प्राशन केले. त्यानंतर त्यालाही जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. आजही त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. आपले छायावर प्रेम होते, आम्ही लग्नही करणार होतो, मात्र घरच्यांनी विरोध केला. छायाला घरच्यांनी मारहाणही केली. घरच्यांकडून लग्नाला विरोध होत असल्याने आणि मारहाण झाल्यानेच छायाने आत्महत्या केली. आणि ती जगली नाही, तर माझा काय उपयोग, असे म्हणत आपणही विष घेतल्याचे प्रताप सांगत असल्याचे विश्वसनिय सूत्रांनी सांगितले. मात्र सत्य परिस्थिती तपासात समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Suicideआत्महत्याBeedबीडBeed civil hospitalजिल्हा रुग्णालय बीड