शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

परळीत पेटवून दिलेल्या महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2017 00:10 IST

परळी शहरातील अशोकनगर इराणी वस्ती येथील भाजलेल्या महिलेचा दहा दिवसानंतर उपचारादरम्यान अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आता त्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.

ठळक मुद्देचौघांवर होणार खुनाचा गुन्हा नोंद

परळी : शहरातील अशोकनगर इराणी वस्ती येथील भाजलेल्या महिलेचा दहा दिवसानंतर उपचारादरम्यान अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणात तिला जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असून आता त्यात खुनाचा गुन्हा दाखल होणार आहे.

शेख शबाना शेख महेबूब (२०) ही महिला राहत्या घरी जळाल्याची घटना घडली होती. तिला अंबाजोगाई येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल केलेले होते. सुरुवातीस या महिलेने अंधश्रद्धेतून स्वत:ला जाळून घेतल्याची चर्चा होती. मात्र जळीत महिलेने तालुका न्यायदंडाधिकारी अंबाजोगाई यांच्याकडे नोंदवलेल्या जवाबावरुन चार आरोपींनी तिला पेटवून दिले असल्याचे समोर आले. याप्रकरणी संभाजीनगर ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आरोपी जिनत, मखमल, ईरफान व जहीर सर्व (रा. इराणी गल्ली, परळी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.या मध्ये आरोपी हे चोरी करण्याच्या सवयीचे असून चोरीचा माल घरात ठेवू दिला नाही म्हणून दोन आरोपींनी घरातील कॅन्डमधील रॉकेल ओतून पेटवून दिले. तसेच दोन आरोपींनी लेकरांना व पतीलाही मारुन टाकू अशा धमक्या दिल्या असल्याचे फिर्यादीत जळीत महिला शेख शबाना शेख महेबूब हिने जबाबात म्हटलेले आहे.

दरम्यान, परळीतील या बहुचर्चित जळीत प्रकरणाला वळण आले असून यातील जळीत महिलेचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे या प्रकरणी आरोपींवर लावलेल्या कलमात वाढ होत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात येईल. अंबाजोगाई येथे शवविच्छेदन करण्यात आले असून याप्रकरणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर यातील आरोपींच्या गुन्हे कलमात वाढ होईल असे पोलीस सूत्रांनी सांगितले. मात्र, अद्यापही प्रकरणातील आरोपींना अटक करण्यात संभाजीनगर पोलिसांना यश आलेले नाही.