शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी आभार मानतो, त्यांनी माझे 1000 रुपये वाचवले...!"; फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची खिल्ली उडवली, नेमकं काय म्हणाले?
2
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
3
"...तर रशियाही अणु चाचण्या करेल";व्लादिमीर पुतीन यांची थेट अमेरिकेला धमकी
4
boAt मध्ये मोठी खांदेपालट! गौरव नय्यर नवे CEO; बदलामुळे वार्षिक पॅकेज चर्चेत, किती मिळणार पगार?
5
"हनिमूनच्या रात्री उशिरापर्यंत ते..."; ७५ वर्षीय नवऱ्याच्या मृत्यूवर काय म्हणाली ३५ वर्षांची नवरी?
6
२०२७ पर्यंत ५ राशींना साडेसाती, प्रदोषात ‘हे’ करावे; पंचक कायमचे टळेल, शनि शुभ-कल्याण करेल!
7
पाकिस्तानातील पेशावरमध्ये बॉम्बस्फोट, ९ जणांचा मृत्यू, ४ पोलिस गंभीर जखमी
8
नेत्याच्या बिल्डर मित्राला ५ तास दालनाबाहेर बसवले; शंकर पाटोळे लाचेच्या रकमेवर ठाम राहिले, कारवाईसाठी मागितले होते ६० लाख रुपये
9
'नादी लागाल तर तुझ्यासह दादांच्या राजकारणाचा देव्हारा करीन'; जरांगेंचा धनंजय मुंडेंना थेट इशारा
10
पंचक योगात शनि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, अशुभता होईल दूर; प्रभावी मंत्र जपाने दोषमुक्त व्हाल!
11
हृदयस्पर्शी! "हॅलो अंकल, आईने मला मारलं, प्लीज लवकर या..."; लेकाने थेट पोलिसांना केला फोन
12
मराठीत आदर मिळतो जो हिंदीत नाही... 'घरत गणपती' फेम निकिता दत्ताची प्रतिक्रिया चर्चेत
13
पाकव्याप्त काश्मीरमध्ये सैन्याची थट्टा; फक्त १० रुपयांत गणवेश-हेल्मेट विक्रीला, व्हिडीओ व्हायरल
14
"तुझे न्यूड पिक्चर पाठवतेस का?" अक्षय कुमारच्या मुलीला आला धक्कादायक मेसेज, काय घडलं नेमकं?
15
केएल राहुलचा 'डबल' धमाका! विराट कोहली आणि रोहित शर्माचा कसोटीतील मोठा विक्रम मोडला
16
तुम्हीही टोल भरताय? मग जाणून घ्या, देशात 'या' लोकांना नियमानुसार मिळते टोलमधून थेट सूट!
17
World Smile Day: ज्याला मिम मटेरिअल समजता, त्याने नुसतं हसून कमावले ३ मिलियन डॉलर!
18
हात पकडून जोरात ओढले..; तीन वर्षीय चिमुकलाने वाचवला आईचा जीव; पाहा धक्कादायक Video
19
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
20
भारतीय कंपनी आणतेय ७००० mah बॅटरीवाला प्रिमिअम फोन, ‘Pixel’ सारखा कॅमेरा डिझाइन; पण किंमत नसेल स्वस्त...

लसीकरणाने मृत्यू, वांझ होण्याची अफवा; ग्रामीण भागात अधिकाऱ्यांची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बीड : जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा कायम आहे. आगोदरच तुटवडा त्यात ग्रामीण भागात लसीकरणाबाबत विविध अफवांना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

बीड : जिल्ह्यात कोरोना लसीचा तुटवडा कायम आहे. आगोदरच तुटवडा त्यात ग्रामीण भागात लसीकरणाबाबत विविध अफवांना पेव फुटले आहे. लसीकरणानंतर मृत्यू होतो, वांझपणा येतो, अशा अफवा पसरत आहेत. या अफवा दूर करताना आरोग्य विभागाची दमछाक होत आहे. सुरुवातीच्या काळात या अफवा जास्त होत्या. परंतु आता या कमी झाल्या असून, लोक लसीकरणासाठी पुढे येत आहेत. माध्यमांसह आरोग्य विभागाकडून जनजागृती केल्याने नागरिकांच्या मनातील गैरसमज दूर झाल्याचे दिसते.

जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ८५ हजार १६६ लोकांना कोराेना लस घेतली आहे. यात पहिला डोस घेणाऱ्यांची संख्या २ लाख ९३ हजार ४७४ एवढी आहे. तर दोन्ही डोस घेतलेल्यांचा आकडा ९१ हजार ६९२ एवढा आहे. सुरुवातीच्या काळात लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध असतानाही केवळ चुकीच्या अफवा आणि मनातील गैरसमजामुळे लसीकरण कमी प्रमाणात झाले होते. आता या अफवा बंद झाल्या असून, लस नसल्याने लसीकरण थांबल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

...

काय आहेत अफवा

अशी आहे पहिली अफवा

सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी एक मेसेज आला. २०२२ साली ज्या लोकांनी लस घेतली आहे, ते सर्वच मरणार. परंतु काही वेळातच हा मेसेज फेक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात आले. त्यामुळे शांतता राहिली.

...

अशी आहे दुसरी अफवा

लस घेतल्यानंतर लकवा येतो, चालता येत नाही, ताप येतो, डोके जड पडते अशा अफवा वाऱ्यासारख्या पसरत होत्या. सुरुवातीच्या काळात यामुळे लोक कमी पुढे आले. परंतु आता या अफवा थांबल्या आहेत.

...

अशी आहे तिसरी अफवा

लस घेतल्यानंतर वांझ होण्याची भीती असते, अशाही काही अफवा ग्रामीण भागात पसरल्या होत्या. परंतु याला जास्त दिवस थारा मिळाला नाही. माध्यमे आणि आरोग्य विभागाने तत्काळ जनजागृती करून त्या दूर केल्या.

...

अधिकाऱ्यांनी स्वत:चे फोटो केले व्हायरल

लसीकरणाच्या सुरुवातीच्या वेळेस लोकांच्या मनात खूप जास्त गैरसमज होते. अगदी हेल्थ वर्कर्सही लस घेण्यासाठी पुढे येत नव्हते. ताप येणे, डोके दुखणे, थकवा येणे अशा अफवा पसरत होत्या. तसेच लस प्रभावी नसल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे सुरुवातीला लसीकरणाचा टक्का खूपच कमी होता. परंतु नंतर आरोग्य विभागासह इतर व्हीआयपी लोकांनी लस घेऊन फोटो व्हायरल केले. त्यानंतर लोकांना याबद्दल विश्वास बसला. आता सर्वांच्या मनातील गैरसमज दूर झालेले आहेत. माध्यमांद्वारेही आरोग्य विभागाने जनजागृती केली होती. आता लोक स्वत:हून लसीकरणासाठी पुढे येत असल्याचे दिसते.

...

अधिकारी म्हणतात....

सुरुवातीला ताप येणे, डोके दुखणे अशा अफवा होत्या. परंतु आता त्या बंद झाल्या आहेत. माध्यमांसह आरोग्य विभागाने याबाबत जनजागृती केली आहे. दोन दिवसांपूर्वी चुकीचा मेसेज व्हायलर झाला होता, परंतु तो फेक असल्याचे जाहीर केले.

-डॉ. एल. आर. तांदळे, तालुका आरोग्य अधिकारी, पाटोदा